श्रीलंकेविरुद्ध नुकतीच खेळलेली तीन सामन्यांची टी२० आंतरराष्ट्रीय मालिका भारतीय संघाचा फलंदाज श्रेयस अय्यरसाठी खास राहिली. श्रेयसने सलग तीन अर्धशतके झळकावली. एवढेच नाही तर संपूर्ण टी२० मालिकेत तो नाबाद राहिला. तीन सामन्यांत एकदाही तो बाद झाला नाही. याचा फायदा त्याला आयसीसी टी२० क्रमवारीत झाला आहे. जिथे त्याने साप्ताहिक अपडेटमध्ये २७ स्थानांनी झेप घेतली आहे.
भारतीय संघाने श्रीलंकेचा ३-० ने पराभव केला आणि त्यानंतर आयसीसीने टी२० क्रमवारीत आपले अव्वल स्थान मजबूत केले. या मालिकेनंतर श्रेयस अय्यरनेही २७ स्थानांची झेप घेतल्याचे दिसून आले. २७ वर्षीय श्रेयस अय्यरने श्रीलंकेविरुद्ध १७४ च्या स्ट्राईक रेटने २०४ धावा केल्या. यामुळेच तो प्रथमच फलंदाजांच्या टी२० क्रमवारीत अव्वल २० मध्ये पोहोचला आहे. तो सध्या १८ व्या स्थानावर आला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या टी२० मालिकेपूर्वी तो या क्रमवारीत ४५ व्या स्थानावर होता.
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारनेही तीन स्थानांची प्रगती केली. तो गोलंदाजांच्या क्रमवारीत १७ व्या स्थानी पोहोचला आहे. श्रीलंकेच्या पथुम निसांकाने दुसऱ्या सामन्यात ७५ धावा केल्या. या आधारावर त्याचा समावेश पहिल्या १० फलंदाजांमध्ये समावेश झाला आहे. त्याचवेळी भारतीय संघाचा माजी कर्णधार व वरिष्ठ फलंदाज विराट कोहली वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेविरुद्धच्या एकूण तीन सामन्यांतून बाहेर पडला होता. त्याच्या या निर्णयाचा त्याला तोटा सहन करावा लागला. तो टॉप १० मधून १५ व्या स्थानावर घसरला आहे.
सांघिक क्रमवारीत भारत प्रथम
टी२० सांघिक क्रमवारीत भारतीय संघ पहिल्या स्थानी आहे. त्यापाठोपाठ इंग्लंड दुसऱ्या आणि पाकिस्तान तिसऱ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंड व पाकिस्तान हे टॉप पाच मधील इतर संघ आहेत.
महत्वाच्या बातम्या-
जगात भारी काय, आयपीएल की पीएसएल? पाकिस्तानी वंशाच्या खेळाडूने घेतले ‘या’ लीगचे नाव (mahasports.in)