भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेत 2-1 असा विजय मिळवला. आता संघाच्या पुढील आव्हान दक्षिण आफ्रिका असेल. दक्षिण आफ्रिका संघ तीन सामन्यांची टी-20 आणि तीन सामन्यांची वनडे मालिका खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर आला आहे. उभय संघातील टी20 मालिका 28 सप्टेंबर रोजी सुरू होणार आहे. टी20 विश्वचषकापूर्वी संघाला स्वतःची गुणवत्ता तपासण्याच्या दृष्टीने ही शेवटची संधी असेल. या मालिकेसाठी भारतीय संघात काही बदल होण्याची शक्यता आहे
दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टी20 विश्वचषक स्पर्धेच्या संघाची घोषणा झाली त्याचवेळी संघ निवड करण्यात आली होती. यामध्ये विश्वचषकासाठी निवडलेल्या हार्दिक पंड्या व भुवनेश्वर कुमार यांचा समावेश नाही. आता या संघात थोडा बदल होण्याची शक्यता आहे. मध्यफळीतील फलंदाज श्रेयस अय्यर याची या मालिकेसाठी संघात वर्णी लागू शकते.
एका प्रमुख क्रिकेट संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, ‘दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या टी20 मालिकेसाठी श्रेयस अय्यर संघात पुनरागमन करु शकतो. मोहम्मद शमी कोविडमधून पूर्णतः बरा न झाल्याने तसेच अष्टपैलू दीपक हुडा पाठीच्या दुखण्यामुळे या मालिकेत सहभागी होण्याची शक्यता कमी आहे. हुडाच्या जागी अय्यर तर शमीच्या जागी उमरान मलिकला संघात सामील केले जाऊ शकते.’
टी20 मालिकेसाठी निवडलेला भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, रिषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी, हर्षल पटेल, दीपक चाहर, जसप्रीत बुमराह.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रीका टी20 मालिकेचे वेळापत्रक
पहिला टी20 सामना – 28 सितंबर, तिरुवनंतपूरम
दुसरा टी20 सामना – 2 ऑक्टोबर, गुवाहाटी
तीसरा टी20 सामना – 4 ऑक्टोबर, इंदोर
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धक्कादायक! तानिया भाटियाच्या हॉटेल रुममधून खासगी साहित्याची चोरी; लंडनमध्ये घडली घटना
विरोधी संघाला धावा गिफ्ट करणाऱ्या भुवनेश्वर कुमारने आंतरराष्ट्रीय टी20मध्ये केली ‘ही’ ऐतिहासिक कामगिरी
भारतीय संघाची साथ सोडून हार्दिक पंड्या निघालाय नवीन दौऱ्यावर, पाहा फोटो