---Advertisement---

PBKS vs Mi: पंजाब किंग्स गुणतालिकेत अव्वलस्थानी पोहोचल्यावर श्रेयस अय्यरचं मोठं वक्तव्य!

On: मंगळवार, मे 27, 2025 3:45 PM
---Advertisement---

पंजाब किंग्स (punjab kings) संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरने (Shreyas iyer) सोमवारी मुख्य प्रशिक्षक रिकी पॉंटिंग (Riki ponting) यांना धन्यवाद दिले. त्याला मोकळेपणाने खेळण्याचे स्वातंत्र्य दिल्याने,त्याच्या निर्णयावर विश्वास ठेवल्याने त्याने त्यांचे आभार मानले. पंजाब संघाने मुंबई इंडियन्सवर 7 विकेटने विजय मिळवला. तसेच आयपीएल 2025 क्वालिफायर 1 मध्ये स्थान निश्चित केले. मागच्या हंगामात देखील कोलकाता नाईट रायडर्स संघाला त्यांची तिसरी आयपीएल ट्रॉफी जिंकून दिल्यानंतर श्रेयस पंजाब किंग्समध्ये सामील झाला आणि त्याने संघाचे रूप पूर्णपणे बदलून टाकले. 2014 नंतर आता श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात पहिल्यांदा पंजाबला प्लेऑफमध्ये पोहोचवले आहे.

श्रेयसने सामन्यानंतर प्रेझेंटेशन सेरीमनीमध्ये म्हटले, रिकी आणि माझ्यात मागच्या काही वर्षांपासून चांगली मैत्री आहे. त्याने मला खूप स्वातंत्र्य दिले आहे, मैदानावर निर्णय घेण्यासाठी सुद्धा तो मला प्रोत्साहित करतो. या सर्व गोष्टी चांगल्या प्रकारे संपन्न झालेल्या आहेत. प्रत्येक खेळाडूने योग्य वेळेवर त्याचे काम केले आहे. पहिल्या सामन्यापासूनच आम्ही प्रत्येक परिस्थितीत सामना जिंकण्याचा विचार करत होतो. जेव्हा आम्ही अडचणीत होतो तेव्हा, आमच्या खेळाडूंनी त्यांचे योगदान दिलं सहयोगी स्टाफचे सुद्धा खूप खूप आभार.

रिकीने खेळाडूंना चांगलं प्रदर्शन करण्यासाठी देखील खूप पाठिंबा दिलेला आहे. माझ्यासाठी देखील खेळाडूंवर विश्वास ठेवणे महत्त्वाचे आहे आणि सुरुवातीपासूनच हे घडत आले आहेत. तुम्हाला पूर्ण काळापर्यंत चांगले संबंध बनवून ठेवावे लागतात. मला वाटते की, ड्रेसिंग रूममध्ये प्रत्येक वेळेस खेळाडूंसोबत चांगलाच व्यवहार करण्यात आला आहे. तो म्हणाला प्रियांश आर्यने (priyansh aarya) 35 चेंडूत 62 धावा आणि जोश इंग्लिशने (josh English) 42 चेंडू 73 धावा केल्या त्यासाठी त्याने दोघांचे कौतुक केले.

प्रियांशने ज्या प्रकारे सुरुवात केली होती, ती शानदार होती हा खेळाडू धाडसी आहे. सरावादरम्यान केलेली कामगिरी आता दिसत आहे. तर पुढे तो म्हणाला, इंग्लिश एकमात्र खेळाडू आहे, ज्याच्या स्थितीमध्ये बदल होत राहतो. कारण त्याला नवे चेंडू खेळायला आवडतात. यामुळे मला वाटत होते की, त्याने अधिक चेंडू खेळावे आणि त्याने अगदी त्याप्रमाणेच काम केले, तो मोठे सामने खेळणारा खेळाडू आहे.

पंजाब सोबत क्वालिफायर वनमध्ये कोण खेळणार हे आज आरसीबी आणि लखनऊच्या सामन्यानंतर स्पष्ट होईल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---