यंदाच्या दुलीप ट्राॅफीच्या सामन्यांना आजपासून (05 सप्टेंबर) सुरुवात झाली असून. गुरुवारी पहिल्या फेरीत चारही संघ ॲक्शनमध्ये दिसत आहेत. भारत ‘अ’ आणि ‘ब’ बंगळुरूमध्ये आमनेसामने आहेत. तर अनंतपूरमध्ये भारत क आणि ड यांच्यात सामना सुरू आहे. स्पर्धेची पहिली फेरी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. कारण त्यानंतर 19 सप्टेंबरपासून बांग्लादेशविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची निवड होणार आहे. या कारणास्तव अनेक मोठे खेळाडू आपला फॉर्म शोधण्यासाठी या स्पर्धेत खेळत आहेत. ज्यामध्ये श्रेयस अय्यरच्या नावाचाही समावेश आहे. मात्र, तो फलंदाजीत फ्लॉप ठरला आणि कोणतेही महत्त्वपूर्ण योगदान न देता बाद झाला.
भारत ‘क’ चा कर्णधार ऋतुराज गायकवाडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयाचा गोलंदाज पुरेपूर फायदा घेत आहेत. डावाच्या पहिल्याच षटकात अंशुल कंबोजने अथर्व तायडेला (4) बाद केले आणि त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी यावे लागले. श्रेयसकडून अपेक्षा होती की तो त्याच्या अनुभवाचा फायदा घेऊन चांगली फलंदाजी करेल आणि संघाला मजबूत स्थितीत घेऊन जाईल पण तसे झाले नाही. श्रेयसने 16 चेंडूत चौकार मारला आणि 9 धावा करून बाद झाला. त्याची विकेट व्ही विजयकुमारने घेतली.
बुची बाबू टूर्नामेंटमध्ये खेळतानाही श्रेयस अय्यर काही खास कामगिरी करू शकला नाही आणि त्याने दोन्ही डावात एकूण 24 धावा केल्या. यावेळी तो दुसऱ्या डावात शाॅर्टबाॅलवर बाद झाला. अशा स्थितीत खराब कामगिरीने झगडणारा श्रेयसची बांग्लादेश कसोटी मालिकेतील दावेदारी कमकुवत होत चालली आहे. दुसऱ्या डावात त्याने आश्चर्यकारक कामगिरी केली नाही तर त्याच्या निवडीवर नक्कीच शंका निर्माण होईल.
दुलीप ट्रॉफीमध्ये खेळल्या जाणाऱ्या या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, भारत ‘क’ संघाने जबरदस्त सुरुवात केली आहे आणि सुरुवातीचे धक्के देऊन भारत ‘ड’ला बॅकफूटवर आणले आहे. या बातमीपर्यंत भारत ‘ड’ संघाने 9 षटकात 28/4 धावा केल्या होत्या. अथर्व तायडे आणि श्रेयस अय्यर यांच्याशिवाय बाद झालेल्या फलंदाजांमध्ये देवदत्त पडिक्कल आणि यश दुबे यांचा समावेश होता.
हेही वाचा-
आंतरराष्ट्रीय टी 20 सामन्याच्या पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक धावा करणारे टाॅप-5 फलंदाज
Paralympics 2024; आठव्या दिवशी भारताच्या खात्यात येऊ शकतात 6 पदके, या खेळातून आशा
6 षटकात 113 धावा; कांगारुंचा विश्वविक्रम, ट्रॅव्हिस हेडची वादळी खेळी