आयपीएलच्या मैदानात रविवारी (१० एप्रिल) कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स अशी लढत पाहायला मिळाली. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने ४४ धावांनी विजय मिळवला. दिल्लीला मिळालेल्या विजयात पृथ्वी शॉ आणि डेविड वॉर्नर यांची खेळी महत्वपूर्ण ठरली. दिल्ली कॅपटल्ससाठी हा त्यांचा चालू आयपीएल हंगामातील दुसरा विजय, तर केकेआरसाठी दुसरा पराभव ठरला. पराभवानंतर केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरने खास प्रतिक्रिया दिली.
केकेआरने हंगामात खेळलेल्या पाच सामन्यापैकी तीन सामने जिंकले आहेत आणि दोन सामने गमावले आहेत. दिल्लीसाठी त्यांचा सलामीवीर पृथ्वी शॉ ५१ आणि डेविड वॉर्नर ६१ धावा करून बाद झाले. या दोघांनी संघाला चांगली सुरुवात दिली होती आणि याच कारणास्तव संघ मोठी धावसंख्या उभारू शकला. प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने ५ विकेट्सच्या नुकसानावर २१५ धावा केल्या.
याच पार्श्वभूमीवर पराभवानंतर श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) म्हणाला की, “त्यांनी (दिल्ली कॅपिटल्स) पहिल्या षटकात चांगली सुरुवात केली. पृथ्वीने गोलंदाजांना त्यांच्या रडारवर घेतले. इमानदारीने सांगायचे तर, आम्हाला समजत नव्हते की, त्यावेळी काय करावे. खरं तर खेळपट्टी चांगली होती. त्यांनी सुरुवातीला चांगली भागीदारी करत लय कायम ठेवली.”
केकेआरने या सामन्यात प्रथम गोलंदाजी केली असून विजयासाठी त्यांना तब्ब्ल २१६ धावांचे लक्ष्य मिळाले होते, जे त्यांना गाठता आले नाही. याविषयी बोलताना श्रेयस म्हणाला की, “आम्ही तीन सामन्यांमध्ये लक्ष्याचा पाठलाग करताना जिंकलो आहोत. पण आज आमच्यासाठी कोणतीच गोष्ट चांगली राहिली नाही. आम्हाला चांगली सुरुवात जरी मिळाली नसली, तरी ७ ते १५ षटाकादरम्यान आम्ही खरच चांगला खेळ दाखवला. त्यानंतर आम्ही १२ चा नेटरनरेट कायम ठेवण्याच्या प्रयत्नात होतो.”
दरम्यान, कर्णधार श्रेयस अय्यरने या सामन्यात केकेआरसाठी सर्वाधिक ५४ धावा केल्या. यासाठी त्याने ३३ चेंडू खेळले आणि ५ चौकारांसह २ षटकार देखील मारले. श्रेयस व्यतिरिक्त केकेआरचा एकही फलंदाज अर्धशतक करू शकत नव्हता. कुलदीप यादवचे प्रदर्शन लक्षणीय राहिले. त्याने दिल्लीसाठी टाकलेल्या ४ षटकात ३५ धावा खर्च करून ४ विकेट्स घेतल्या. या कामगिरीसाठी कुलदीपला सामनावीर निवडले गेले.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
“चेन्नई-मुंबईच्या नावाकडे आता अन्य संघ पाहात नाही, त्यांचा जुना दरारा राहिला नाही”