नवीन वर्षातल्या पहिल्या मालिकेसाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. न्यूझीलंडविरुद्ध तीन वनडे सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेसाठी श्रेयस अय्यरचं (Shreyas iyer) संघात पुनरागमन झालं आहे मात्र त्याचा मालिकेतील सहभाग वैद्यकीय परवानगीवर अवलंबून असेल.
मानेला झालेल्या दुखापतीमुळे गिल (Shubman gill) आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळू शकला नव्हता. मात्र आता तो या दुखापतीतून सावरला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात झालेल्या दुखापतीमुळे श्रेयस अय्यर प्रदीर्घ काळ मैदानापासून दूर होता. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी त्याची संघात निवड करण्यात आली आहे. मात्र त्याचं खेळणं बंगळुरूस्थित नॅशनल क्रिकेट अकादमीतील वैद्यकीय परवानगीवर अवलंबून असेल.
गिल, श्रेयस आणि सिराज हे तिलक वर्मा, ध्रुव जुरेल आणि ऋतुराज गायकवाड यांच्या जागी परतले आहेत.
भारतीय संघ- शुबमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, के.एल.राहुल, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, प्रसिध कृष्णा, कुलदीप यादव, ऋषभ पंत, नितीश कुमार रेड्डी, अर्शदीप सिंग, यशस्वी जयस्वाल.






