---Advertisement---

न्यूझीलंड मालिकेपूर्वी ‘या’ संघाविरुद्ध मैदानात उतरणार श्रेयस अय्यर! या दिवशी होणार उपकर्णधाराचे पुनरागमन

On: शनिवार, जानेवारी 3, 2026 6:56 PM
---Advertisement---

श्रेयस अय्यर (Shreyas iyer) न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेद्वारे पुनरागमन करणार आहे, बीसीसीआयने (BCCI) यासाठी संघाची घोषणा केली आहे. 11 जानेवारीपासून 3 सामन्यांची वनडे मालिका सुरू होणार आहे, परंतु त्याआधीच अय्यर मैदानात दिसणार आहे.

श्रेयस अय्यर गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यात जखमी झाला होता. सिडनीमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात झेल घेताना तो पडला आणि त्याच्या बरगड्यांना दुखापत झाली. स्कॅनमध्ये ‘इंटरनल ब्लीडिंग’ (अंतर्गत रक्तस्त्राव) झाल्याचे समजले, ज्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या दुखापतीमुळे उपकर्णधार अय्यर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेला मुकला होता, पण आता न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतून तो पुनरागमन करत आहे.

रिपोर्ट्सनुसार, श्रेयस अय्यर न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी ‘विजय हजारे ट्रॉफी’मध्ये खेळणार आहे. तो 6 जानेवारीला मुंबई संघाकडून हिमाचल प्रदेशविरुद्ध मैदानात उतरेल. दुखापतीनंतरचा अय्यरचा हा पहिला मोठा सामना असल्याने हा सामना खूप खास असेल.
गेल्या अनेक दिवसांपासून अय्यर बेंगळुरू येथील ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ (COE) मध्ये रिहॅब (दुखापतीतून सावरण्याचा सराव) करत आहे. यादरम्यान त्याने 2 जानेवारी रोजी आपला 50 षटकांचा पहिला सराव सामना खेळला. 6 जानेवारीला विजय हजारे ट्रॉफीमध्ये तो खेळला, तर तो सामना त्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरेल. न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी अय्यरचा संघात समावेश करण्यात आला आहे. मात्र, बीसीसीआयने स्पष्ट केले आहे की, त्याला अजून बीसीसीआय ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’कडून (COE) फिटनेस क्लीयरन्स (फिट असल्याचे प्रमाणपत्र) मिळणे बाकी आहे.

बीसीसीआयने सांगितले की, श्रेयस अय्यरची उपलब्धता बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्सच्या फिटनेस क्लीयरन्सवर अवलंबून असेल. हार्दिक पांड्या या संघाचा भाग नाही. त्याच्याबद्दल बीसीसीआयने सांगितले की, हार्दिकला एका सामन्यात 10 षटके गोलंदाजी करण्याची परवानगी अद्याप मिळालेली नाही. आगामी आयसीसी पुरुष टी-20 वर्ल्ड कप लक्षात घेता त्याच्या वर्कलोडचे व्यवस्थापन केले जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---