आयपीएल 2025 च्या मेगा लिलावाची तयारी सुरू आहे. 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी जेद्दाह येथे मेगा लिलाव आयोजित केला जाईल. यावेळी सर्व 10 संघ त्यांच्या आवडत्या खेळाडूंवर पैज लावतील. सर्वांच्या नजरा भारताचा स्टार खेळाडू आणि माजी आयपीएल चॅम्पियन कर्णधार श्रेयस अय्यरवर असतील. आयपीएल लिलावात अनेक संघ अय्यरवर बाजी मारतील. श्रेयस अय्यरने गेल्या मोसमात कोलकाता नाईट रायडर्स संघाला त्याच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन बनवले होते. दरम्यान, त्याने टी20 स्पर्धेमध्येही शानदार शतक झळकावले आहे.
टीम इंडियाचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरने मुंबईकडून खेळताना चमकदार कामगिरी केली आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये खेळताना त्याने गोव्याविरुद्ध शतक झळकावले आहे. मुंबई विरुद्ध गोवा यांच्यात खेळल्या जात असलेल्या या सामन्यात अय्यरने केवळ 57 चेंडूत 130 धावा केल्या. ज्यात त्याने 228.07 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या. या सामन्यात त्याने 11 चौकार आणि 10 षटकारही मारले. अय्यरच्या या खेळीमुळे मुंबई संघाने 20 षटकांत 4 गडी गमावून 250 धावा केल्या. सामन्यात अय्यर नाबाद राहिला.
🚨 SHREYAS IYER SMASHED A CENTURY IN SMAT..!!! 🚨pic.twitter.com/4WnndwkKGW
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 23, 2024
अय्यरने ही खेळी अगदी योग्य वेळी खेळली आहे. आयपीएल मेगा लिलावाच्या एक दिवस आधी अय्यरने हे शतक झळकावले आहे. त्यामुळे आयपीएल संघ त्याला आपल्या संघात समाविष्ट करण्यासाठी चांगला पैसा खर्च करू शकतात. कोलकाता नाईट रायडर्सने त्याला या मोसमात कायम ठेवले नाही.
श्रेयस अय्यरच्या आयपीएल कारकिर्दीवर एक नजर टाकली तर तो आयपीएलमध्ये दोन आयपीएल संघांसाठी खेळला आहे. ज्यात केकेआर व्यतिरिक्त दिल्ली कॅपिटल्सच्या नावाचाही समावेश आहे. अय्यरने आयपीएल कारकिर्दीत 116 सामन्यांत 3127 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये त्याचा स्ट्राईक रेटही अप्रतिम होता. त्याने आयपीएलमध्ये 127.47 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली आहे.
हेही वाचा-
IPL 2025; मेगा लिलावासाठी कोणत्या संघाकडे किती पैसे शिल्लक? पंजाब किंग्जकडे सर्वाधिक तर….
कसोटी क्रिकेटमध्ये फाईव्ह विकेट हॉल घेणारे भारतीय कर्णधार, दिग्गजांच्या यादीत जसप्रीत बुमराहचाही समावेश!
“मी तुझ्यापेक्षा वेगवान गोलंदाजी करतो….”, मिचेल स्टार्कची हर्षित राणाला ‘धमकी’; मैदानावरील व्हिडिओ व्हायरल