---Advertisement---

अतरंगी बहिण-भाऊ! श्रेयस अय्यर लहान बहिणीबरोबर खेळतोय ‘हा’ अनोखा खेळ, व्हिडिओ भन्नाट व्हायरल

On: शनिवार, जून 26, 2021 5:23 PM
---Advertisement---

लहानपणापासून प्रेम, भांडण, मस्ती, आनंद, रडणं अशा अनेक भावना ज्या नात्यात अनुभवता येतात, ते नातं म्हणजे भावा-बहिणीचं नातं. आपण अनेकदा घरी असलो की आपल्या भावंडांबरोबर मस्ती करत असतो. कधी एकमेकांना कोणत्याही गोष्टीचं चॅलेंजही देतो. असाच काहीसा प्रकार भारतीय संघाचा फलंदाज श्रेयस अय्यरच्या घरात पाहायला मिळाला आहे. नुकताच श्रेयसचा आणि त्याच्या बहिणीचा एक गमतीशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या व्हिडिओमध्ये श्रेयस आपली बहिण श्रेष्ठा बरोबर एक गमतीशीर खेळ खेळताना दिसत आहे. यामध्ये एकजण ज्या दिशेने हात करेल, त्याच्या विरुद्ध दिशेला दुसऱ्याने पाहायचे, असा काहीसा हा खेळ असल्याचे दिसते. या व्हिडिओमध्ये श्रेयसचा पाळीव कुत्री बेट्टी देखील दिसत आहे. या व्हिडिओला श्रेयसने कॅप्शन दिले आहे की ‘बेट्टी जोपर्यंत वैतागत नाही, तोपर्यंत ती पंच होती.’

https://www.instagram.com/p/CQit262Dvoo/

श्रेयसच्या या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. टागर श्रॉफनेही हासण्याची इमोजीसह कमेंट केली आहे.

Screengrab: Instagram/Shreyas Iyer

श्रेष्ठा ही श्रेयसपेक्षा लहान असून ती डान्सर आहे. ती अनेकदा तिचे डान्सचे व्हिडिओ तिच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवरुन शेअर करत असते. मागीलवर्षी तिचा आणि श्रेयसचा घरात डान्स करतानाचा मजेशीर व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता.

https://www.instagram.com/p/B-rpJ11JBfx/

दुखापतीतून सावरतोय श्रेयस 
सध्या श्रेयस खांद्याच्या दुखापतीतून सावरत आहे. त्याला मार्च महिन्यात इंग्लंडविरुद्ध वनडे मालिका खेळताना खांद्याची दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला एप्रिलमध्ये त्याच्या खांद्यावर शस्त्रक्रिया देखील करुन घ्यावी लागली. या दुखापतीतून श्रेयस आता बऱ्यापैकी सावरला असून त्याने सरावासही सुरुवात केली आहे.

मात्र, अजूनही तो पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याने त्याची पुढील महिन्यात होणाऱ्या श्रीलंका दौऱ्यासाठी भारताच्या मर्यादीत षटकांच्या संघात निवड झालेली नाही. त्यामुळे आता श्रेयस थेट आयपीएल २०२१ चा उर्वरित हंगाम दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना दिसून येऊ शकतो. तो एप्रिलमध्ये आयपीएल २०२१ ला सुरुवात झाली तेव्हा याच दुखापतीमुळे संघातून बाहेर होता. मात्र, या हंगामाला कोरोना व्हायरसच्या धोक्यामुळे मे महिन्याच्या सुरुवातीलाच स्थगित करावे लागले.

आता हा उर्वरित हंगाम सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यांत खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे तोपर्यंत श्रेयस पूर्णपणे तंदुरुस्त होण्याची शक्यता आहे. आयपीएल २०२१ स्थगित होण्यापूर्वी श्रेयस ऐवजी दिल्ली कॅपिटल्स संघाचे नेतृत्व रिषभ पंतने केले होते. त्यामुळे आता हे पाहाणे देखील औत्सुक्याचे असेल की जर उर्वरित आयपीएल २०२१ हंगामात श्रेयसचे पुनरागमन झाले तर तोच दिल्लीचे नेतृत्व करणार की या पूर्ण हंगामात पंतच कर्णधारपद सांभाळणार.

महत्त्वाच्या बातम्या – 

भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये ‘या’ तिघांचा समावेश झाला तर ‘मिशन इंग्लंड’ होणार फत्ते

धोक्याची घंटा! टी२० विश्वचषकासाठी त्या खेळाडूंना ऑस्ट्रेलियन संघात स्थान मिळणे कठीण, फिंचने दिला इशारा

बायको असावी तर अशी! बुमराहसाठी पत्नी संजनाने बनवले ‘रोमँटिक जेवण’, फोटो होतोय व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---