आयपीएल २०२१ हंगामाला शुक्रवारी(9 एप्रिल) सुरुवात झाली. या हंगामातील दुसरा सामना आज(10 एप्रिल) होणार आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघात हा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यापासून दिल्लीच्या नेतृत्वाची धूरा रिषभ पंत सांभाळणार आहे. या हंगामाला दिल्लीचा नियमीत कर्णधार श्रेयस अय्यर दुखापतीमुळे मुकणार आहे. त्यामुळे पंतला यंदा दिल्लीने कर्णधारपदाचा मुकूट चढवला आहे.
श्रेयस जरी यंदाचा हंगाम मुकणार असला तरी तो संघाला मैदानाबाहेरुन प्रोत्साहन देण्यास सज्ज आहे. त्याने एक व्हिडिओ शेअर करत दिल्ली संघाचा खास संदेश दिला आहे.
प्रत्येक चेंडूंसोबत मी पण तुमच्या सोबतीला असेल – श्रेयस अय्यर
श्रेयसच्या संदेशाचा व्हिडिओ दिल्लीने शेअर केला आहे. त्यात श्रेयस म्हणतो, “प्रिय दिल्ली, आज मी तुमच्याशी या टीमचा चाहता म्हणून बोलत आहे. मला माहित आहे की हे सोपे असणार नाही. पण त्यासाठी आपण खूप मेहनत केली आहे. मला माहित आहे की आयपीएल चषक उंचावण्यासाठी सर्व काही प्रयत्न करणे शक्य आहे. आपण एक संघ म्हणून अधिक योगदान देण्याचा प्रयत्न करू. प्रत्येक सामन्यादरम्यान तुम्हाला मी खांद्याला खांदा लावून उभा असल्याचे दिसेल. मी तुमचा सर्वात मोठा समर्थक आहे. मी तुमच्यासाठी जोरदार चिअर करेल. उत्साहित रहा, तुमच्या सर्वांना खूप खूप प्रेम. तुमचाच, श्रेयस.”
https://twitter.com/DelhiCapitals/status/1380825586235367426
इंग्लंडविरुद्ध खेळताना झाली होती दुखापत
इंग्लंडविरुद्ध २३ मार्च रोजी पहिला वनडे सामना खेळत असताना इंग्लंडच्या डावाच्या ८ व्या षटकात शार्दुल ठाकूरच्या चेंडूवर जॉनी बेअरस्टोने फटका खेळला. तो चेंडू आडवण्यासाठी श्रेयस अय्यरने उडी मारली. पण त्याचवेळी त्याच्या खांद्याला दुखापत झाली होती. या दुखापतीनंतर श्रेयसच्या खांद्यावर ८ एप्रिल रोजी शस्त्रक्रिया करण्यात आली.
महत्त्वाच्या बातम्या –
‘बहुत मजा आयेगा आज!’ धोनी-पंतला आमने-सामने पाहण्यास टीम इंडियाचे गुरु सज्ज
रोहितला धावबाद केल्याचं ख्रिस लिनला आलं टेंशन; म्हणाला, ‘कदाचित मला पुढील सामन्यात…’






