राजस्थान रॉयल्सविरुद्ध कोलकाता नाईट रायडर्सकडून धमाकेदार फलंदाजी प्रदर्शन करत रिंकू सिंग चर्चेत आला आहे. राजस्थानने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना १५२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात कोलकाताला अपेक्षित सुरुवात मिळाली नाही. त्यांनी ३२ धावांवरच त्यांचे सलामीवीर गमावले. त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरही ३४ धावांवर बाद झाला. त्यानंतर रिंकूने नितीश राणासोबत मिळून अभेद्य भागीदारी रचत संघाला १९.१ षटकातच सामना जिंकून दिला.
रिंकूच्या (Rinku Singh) या मॅच विनिंग खेळीबद्दल संघाचा कर्णधार श्रेयसने (Shreyas Iyer) प्रतिक्रिया दिली आहे. श्रेयसने रिंकूला कोलकाताचा भविष्यातील सितारा (Future Star) म्हटले आहे.
रिंकूने पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येत २३ चेंडूंमध्ये १ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने नाबाद ४२ धावा केल्या. त्याच्या या खेळीसाठी त्याला सामनावीर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
सामन्यानंतर श्रेयसने रिंकूचे (Shreyas Iyer Praises Rinku Singh) कौतुक करताना म्हटले की, “रिंकू संघासाठी खूप महत्त्वपूर्ण खेळाडू आहे. मी माझ्या संघ सहकाऱ्यांना सांगून ठेवले होते की, तो हिंमतीने खेळत आहे आणि तो दबावाला स्वतवर हावी होऊ देत नाही. त्याने या हंगामात केवळ ३च सामने खेळले आहे. परंतु या सामन्यांमध्येच त्याने धुमाकूळ घातला आहे. तो भविष्यात फ्रँचायझीसाठी मोठ्या संपत्ती संपत्तीसारखा सिद्ध होऊ शकतो. रिंकू ज्याप्रकारे खेळीची सुरुवात करतो, त्यावरून तो अजिबात नवखा खेळाडू वाटत नाही.”
याबरोबरच श्रेयसने संघातील गोलंदाजांचेही कौतुक केले आहे. “पावरप्लेमध्ये आमच्या गोलंदाजांनी फक्त ३६ धावा दिल्या आणि १ विकेट घेतली. ही तशीच सुरुवात होती, ज्याची आम्हाला गरज होती. उमेश यादवने त्याचा वेग वाढवला आणि तो कठिण लेंथने गोलंदाजी करू लागला. एका कर्णधाराच्या रूपात तुम्हाला फक्त गोलंदाजाकडे चेंडू सोपवायचा असतो. चेंडू जेव्हा मी सुनिल नारायणकडे देतो, तेव्हा तो विकेट काढतोच. फलंदाजही त्याच्याविरुद्ध जोखीम घेत नाहीत. तो खूप महत्त्वपूर्ण गोलंदाज आहे. त्याला जेव्हाही विकेट मिळते, तेव्हा मोठीच विकेट मिळते,” असेही पुढे श्रेयस म्हणाला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
मुंबई इंडियन्सचा सर्वात यशस्वी प्रशिक्षकाने निवडले ‘बेस्ट ५ टी२०’ खेळाडू, ‘या’ एका भारतीयाचा समावेश
किती गोड! इंग्लंडमध्ये पुजाराला चीयर करतेय ‘खास चाहती’, क्यूट व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस
गलती से मिस्टेक! ट्रेंट बोल्टच्या पायाला लागला प्रसिद्ध कृष्णाचा तेजतर्रार थ्रो, धापकन पडला खाली