---Advertisement---

“सिंहासारख्या दृढ निश्चयाने करेल पुनरागमन”, श्रेयस अय्यरने शस्त्रक्रियनंतर दिली प्रतिक्रिया

On: गुरूवार, एप्रिल 8, 2021 7:37 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात पार पडलेल्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत भारतीय संघाने २-१ ने विजय मिळवला होता. या मालिकेतील पहिल्या सामन्यात श्रेयस अय्यर याच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली होती. यामुळे तो उर्वरित वनडे मालिकेला मुकला होता. तसेच दुखापत गंभीर असल्यामुळे तो आयपीएल २०२१ मधून देखील बाहेर झाला आहे. अशात अय्यरच्या दुखापतीविषयी मोठी माहिती पुढे येत आहे. त्याच्या खांद्यावर गुरुवारी (८ एप्रिल) शस्त्रक्रिया झाली आहे.

श्रेयस अय्यरने ट्विट करत दिली माहिती
श्रेयसने त्याच्या खांद्यावर शस्त्रक्रिया झाल्याची माहिती ट्विट करत दिली आहे. त्याने त्याचा शस्त्रक्रिया झाल्यानंतरचा हॉस्पिटलमधील फोटोही शेअर केला आहे. तसेच या ट्विटमध्ये त्याने लिहिले आहे की “शस्त्रक्रिया यशस्वी झाली. आता सिंहाप्रमाणेच दृढ निश्चयासह लवकरच पुनरागमन करेल. तुमच्या शुभेच्छांसाठी धन्यवाद.”

या शस्त्रक्रियेनंतर आता अय्यरला जवळपास ४ ते ५ महिने क्रिकेटपासून दूर रहावे लागू शकते.

https://twitter.com/ShreyasIyer15/status/1380095499806535681

इंग्लंडविरुद्ध खेळताना झाली होती दुखापत
इंग्लंडविरुद्ध २३ मार्च रोजी पहिला वनडे सामना खेळत असताना  इंग्लंडच्या डावाच्या ८ व्या षटकात शार्दुल ठाकूरच्या चेंडूवर जॉनी बेअरस्टोने फटका खेळला. तो चेंडू आडवण्यासाठी श्रेयस अय्यरने उडी मारली. पण त्याचवेळी त्याच्या खांद्याला दुखापत झाली.

आयपीएल २०२१ हंगामाला मुकणार
श्रेयस अय्यर गेल्या ३ हंगामापासून दिल्ली कॅपिटल्स संघाचे नेतृत्व करत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली दिल्ली संघाने २०१९ साली प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता. तर २०२० साली दिल्लीने अंतिम सामना पहिल्यांदाच गाठण्याचाही पराक्रम केला होता. मात्र, यंदाच्या हंगामाला त्याला दुखापतीमुळे मुकावे लागणार आहे. त्यामुळे दिल्लीने ९ एप्रिलपासून सुरु होणाऱ्या आयपीएलच्या १४ व्या हंगामासाठी त्याच्याऐवजी रिषभ पंतकडे कर्णधारपद सोपवले आहे.

काऊंटी क्रिकेटलाही मुकणार
खरंतर श्रेयसने दुखापत होण्याआधी काऊंटी संघ लंकाशायरबरोबर रॉयल लंडन वनडे कप स्पर्धेसाठी करार केला होता. मात्र, आता या स्पर्धेलाही तो मुकण्याची दाट शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

आनंदाची बातमी! ‘मास्टर-ब्लास्टर’ सचिन तेंडुलकर हॉस्पिटलमधून परतला घरी; लिहिला ‘हा’ खास संदेश

धोनी १४ व्या हंगामानंतर घेणार आयपीएलमधून निवृत्ती? चेन्नईच्या बड्या अधिकाऱ्याने दिले ‘हे’ उत्तर

मुंबई विरुद्ध बेंगलोर सामन्याने होणार आयपीएल २०२१ ची सुरुवात, पाहा संपूर्ण वेळापत्रक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---