रविवारी (१० ऑक्टोबर) चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये क्वालिफायर १ ची लढत पाहायला मिळाली. या चुरशीच्या लढतीत चेन्नई सुपर किंग्स संघाने ४ गडी राखून विजय मिळवला. यासह त्यांनी आयपीएल २०२१ स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाची फलंदाजी सुरू असताना श्रेयस अय्यरने टिपलेला अविश्वसनीय झेल देखील सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय, ज्याचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
या निर्णायक सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघात मोठा बदल करण्यात आला होता. दुखापग्रस्त असलेल्या सुरेश रैनाऐवजी रॉबिन उथप्पाला संधी देण्यात आली होती. या संधीचा पुरेपूर फायदा घेत रॉबिन उथप्पाने अप्रतिम खेळी केली. दिल्ली कॅपिटल्स संघाने दिलेल्या १७३ धावांचा पाठलाग करताना रॉबिन उथप्पाची बॅट चांगलीच तळपली. त्याने ४४ चेंडूंमध्ये ६३ धावांची खेळी केली. या खेळी दरम्यान त्याने सात चौकार आणि दोन षटकार मारले होते. त्यानंतर श्रेयस अय्यरच्या हातून झेलबाद होऊन तो माघारी परतला होता.
तर झाले असे की, १४ वे षटक सुरू असताना टॉम करण गोलंदाजीला आला होता. या षटकातील तिसऱ्या चेंडूवर रॉबिन उथप्पाने मिड ऑनच्या दिशेने मोठा फटका खेळला. हा फटका पाहून असे वाटत होते की, चेंडू सीमारेषेच्या पार जाईल. परंतु सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असलेल्या श्रेयस अय्यरने हा चेंडू अडवला आणि इतक्यात त्याच्या तोल जात होता.
Cool, calm and collected 😎
Shreyas Iyer keeps his nerve to complete the catch, stepping in and out of the boundary. Robin Uthappa is dismissed after a fine knock 💪#DCvCSK #IPL2O21🏆 #robbie pic.twitter.com/dPRiokA8ok
— Arshi.. (@ArsCasm_) October 10, 2021
त्यावेळी त्याने चेंडू मैदानाच्या आत उडवला आणि सीमारेषेच्या बाहेर जाऊन पुन्हा आत आला आणि अप्रतिम झेल टिपला. या झेलचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तसेच चाहते देखील आपल्या प्रतिक्रीया देत आहेत. या सामन्याच्या शेवटी ऋतुराज गायकवाड आणि एमएस धोनी यांनी ताबडतोड खेळी करत चेन्नई सुपर किंग्स संघाला विजय मिळवून दिला. धोनीने नाबाद १८ धावा केल्या. तर ऋतुराज गायकवाडने ७० धावांचे बहुमूल्य योगदान दिले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
धोनीचा विजयी चौकार आणि अश्रूंचा फुटला बांध, साक्षीही झाली भावुक; झिवाला घेतले कवेत