श्रेयस अय्यरच्या (shreyas iyer) नेतृत्वात पंजाब किंग्स (punjab kings) आयपीएल 2025 (IPL 2025) मध्ये शानदार प्रदर्शन करत आली आहे आणि अंतिम सामन्यात स्थान बनवण्यासाठी प्रयत्न करत आहे. गुरुवारी झालेल्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात आरसीबीकडून 8 विकेट्सने पंजाबला पराभव पत्करावा लागला. या पराभवाने संघ खूप खचलेला दिसत आहे. आरसीबी विरुद्ध पंजाबच्या सर्वच फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. ज्यामध्ये एक नाव कर्णधार श्रेयस सुद्धा आहे. त्याच्या बॅटने केवळ दोन धावा निघाल्या. जिथे त्याची शिकार गोलंदाज जोश हेजलवूडने घेतली. त्याच्या खराब प्रदर्शनानंतर आणि संघ पराभूत झाल्यानंतर आता माजी ऑस्ट्रेलिया क्रिकेटर टॉम मूडीने त्याला सुनावले आहे. (Former australia cricketor about shreyas iyer)
मूडीने (moody) कोणत्याही संकोच्याविना म्हटले की, श्रेयस जोश हेजलवूड (josh Hazlewood) पुढे टिकला नाही आणि शेवटी पंजाबला सामना गमवावा लागला. इंडियन एक्सप्रेसनुसार मुडी यांचं म्हणणं आहे की, श्रेयस अय्यरला त्याचा अहंकार बाजूला सारून पुढे जाण्याची गरज आहे. ते म्हणाले, पंजाबच्या कर्णधाराने खेळाची परिस्थिती आणि स्वतःच्या परिस्थितीला पूर्ण पद्धतीने चुकीचे समजले आहे. टी 20 मध्ये ऑस्ट्रेलिया गोलंदाजाने श्रेयसला चार वेळा बाद केले आहे त्याने 22 चेंडूंचा सामना करत केवळ 11 धावा केल्या आहेत.
अय्यर विषयी पुढे बोलताना मूडी म्हणाले, कधी-कधी तुम्हाला तुमचा अहंकार खिशात ठेवावा लागतो आणि पुढे जाणं गरजेचं असतं. भूतकाळात जे काही योग्य घडलं नाही ते दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि पुढे गेले पाहिजे. तुम्ही फक्त हेजलवुडने त्याला बाद करताना पाहिलेलं आहे.






