---Advertisement---

‘आम्ही एकाच कॉलेजमधील,’ रवी शास्त्रींकडून श्रेयस अय्यरसोबतचे फोटो शेअर; टीम इंडियासाठी मोठे संकेत

On: मंगळवार, नोव्हेंबर 24, 2020 1:45 PM
---Advertisement---

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री हे नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असतात. ते भारतीय संघातील खेळाडूंबद्दल सतत ट्वीट करतात. तसेच, फोटो आणि व्हिडिओही शेअर करताना दिसतात. अशामध्ये भारतीय संघ आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे आणि या दौऱ्यातील वनडे मालिकेपूर्वी जोरात सराव करत आहे. यादरम्यान रवी शास्त्री यांनी काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ते मधल्या फळीतील धडाकेबाज फलंदाज श्रेयस अय्यरसोबत चर्चा करताना दिसत आहेत. यादरम्यान त्यांनी सांगितले की, ते दोघेही एकाच शाळेतील आणि कॉलेजमधील आहेत. यावरून अय्यरला कसोटी संघात स्थान मिळण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

त्यांनी लिहिले की, “एकमेकांना जाणून घेण्याची गरज आहे. हे जाणून आनंद झाला की, ज्या शाळेतून आणि कॉलेजमधून मी शिक्षण घेतले होते. त्याचमधून त्यानेही शिक्षण घेतले आहे.” यासह त्यांनी हसणाऱ्या ईमोजीचाही समावेश केला आहे.

तरीही चाहत्यांनी या फोटोवर मजेशीर कमेंट केली आहे. चाहत्यांचे असे मत आहे की, श्रेयस अय्यरची कसोटी संघात जागा बनताना दिसत आहे. खरं तर रोहित शर्मा अजूनही भारतात आहे आणि याबाबतीत रवी शास्त्री यांनी म्हटले होते की, जर त्याला कसोटीत खेळायचे असेल, तर त्याला ऑस्ट्रेलियाला लवकर रवाना व्हावे लागेल.

इतकेच नाही तर चाहत्यांनी कसोटी क्रिकेटसाठी अय्यरला रोहितपेक्षाही चांगले म्हटले आहे. अय्यरला कसोटी संघात सामील केलेले नाही. अशी चर्चा सुरू आहे की, जर रोहितला काही कारणांमुळे दौऱ्यावर जाता आले नाही, तर अय्यरला संधी मिळू शकते.

शास्त्री यांच्या ट्वीटवर एका चाहत्याने कमेंट करत म्हटले की, एका कॉलेजमधील आहेत, तर कसोटी संघात स्थान देणार का?

महत्त्वाच्या बातम्या-

मोठी बातमी! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेला रोहित आणि ईशांत मुकण्याची शक्यता

‘ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणे आव्हानात्मक, स्वतःशीच सामना करण्यासाठी तयार’, भारतीय घातक वेगवान गोलंदाजाची प्रतिक्रिया

धोनीच्या फार्म हाऊसमधील टोमॅटो आणि दुधाची विक्री झाली सुरू; किंमती घ्या जाणून

ट्रेंडिंग लेख-

ऑस्ट्रेलियन फलंदाजांना ‘सळो की पळो’ करून सोडणारे ३ भारतीय गोलंदाज

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे सामन्यांतील टीम इंडियाचे सर्वात मोठे ३ विजय

वडिलांचं निधन झाल्यावरही देशासाठी मैदानावर लढलेले ३ भारतीय क्रिकेटर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---