रविवार (10 मार्च) पासून रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. या विजेतेपदाच्या लढतीत 41 वेळच्या चॅम्पियन मुंबईसमोर 2 वेळच्या चॅम्पियन विदर्भाचं आव्हान असेल. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत.
या अंतिम सामन्यापूर्वी सोशल मीडियावर एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अंतिम सामना खेळण्यापूर्वी मुंबईचा खेळाडू श्रेयस अय्यर माँ कालीच्या दरबारात पोहोचला. श्रेयस अय्यरनं माँ कालीच्या दरबारात पूजा केली. ज्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडिया यूजर्स या फोटोवर सतत कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.
Shreyas Iyer visited Maa Kaali Temple ahead of the Ranji Trophy Final. pic.twitter.com/eTPfv5OM0i
— Johns. (@CricCrazyJohns) March 9, 2024
टीम इंडियासाठी मधल्या फळीत फलंदाजी करणाऱ्या श्रेयस अय्यरला नुकताच मोठा धक्का बसला होता. बीसीसीआयनं श्रेयस अय्यरला आपल्या वार्षिक करारातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. श्रेयस अय्यर व्यतिरिक्त, बीसीसीआयनं यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनचाही आपल्या वार्षिक करारामध्ये समावेश केला नाही. हे दोघं देशांतर्गत क्रिकेट खेळत नसल्याने बीसीसीआयनं हा कठोर निर्णय घेतला आहे. यानंतर श्रेयस अय्यर चर्चेचा विषय राहिला होता. बीसीसीआयच्या दणक्यानंतर तो मुंबईसाठी रणजी स्पर्धेत खेळताना दिसला. आता तो रणजी ट्रॉफी फायनलपूर्वी माँ कालीच्या दरबारात पोहोचला आहे. जिथे त्यानं देवीची प्रार्थना केली.
श्रेयस अय्यरनं आतापर्यंत 14 कसोटी सामन्यांमध्ये टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं आहे. याशिवाय त्यानं 59 एकदिवसीय आणि 51 टी-20 सामने खेळले आहेत. श्रेयस अय्यरनं कसोटी सामन्यात 36.86 च्या सरासरीनं 811 धावा केल्या, ज्यामध्ये 1 शतक आणि 5 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याच वेळी, त्यानं एकदिवसीय सामन्यांमध्ये 49.65 च्या सरासरीनं 2383 धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये श्रेयस अय्यरनं 5 शतकांसह 18 अर्धशतकांची नोंद केली आहे. टी 20 फॉरमॅटमध्ये श्रेयस अय्यरनं 136.13 चा स्ट्राइक रेट आणि 30.67 च्या सरासरीनं 1104 धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये श्रेयस अय्यरनं 8 वेळा पन्नास धावांचा टप्पा ओलांडलाय.
इतर बातम्या-
बीसीसीआयने अखेर ईशान किशन-श्रेयस अय्यरची जिरवली मस्ती, अखेर ज्याची शक्यता होती तेच झालं
अजित आगरकर श्रेयस अय्यरच्या या कृतीमुळे संतापले होते का? अहवालात समोर आले मोठे कारण
BCCI च्या करारातून श्रेयस-इशानला वगळल्यानंतर रोहितची पहिली प्रतिक्रिया, सक्त ताकीद देत म्हणाला…