भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसरा वनडे सामना पावसामुळे रद्द झाला. यामुळे शिखर धवन याच्या नेतृत्वाखालील भारताला तीन सामन्यांची वनडे मालिका 1-0 अशी गमवावी लागली. या मालिकेत भारताच्या काही खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली असून दिग्गजांनीही त्यांचे कौतुक केले आहे. यामध्ये वॉशिंग्टन सुंदर आणि श्रेयस अय्यर यांनी जबरदस्त खेळी केल्याने त्यांना संघात सातत्याने ठेवा असे मत दिग्गजाने मांडले आहे.
आकाश चौप्रा याने न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेतील भारतीय खेळाडूंच्या प्रदर्शनाबाबत आपल्या युट्युब चॅनलवर सांगितले. त्यांनी म्हटले, “वनडे क्रिकेटमध्ये श्रेयस अय्यरचा खेळ वेगळाच आहे. त्याच्याविरुद्ध शॉर्ट पीच गोलंदाजी करा किंवा चेंडू अधिक स्पिन होणारा करा तो त्यातून पुढे जातो. कारण त्याचा खेळण्याचे कौशल्यच सर्वांपेक्षा वेगळे आहे. वनडे क्रिकेटमध्ये त्याने सातत्य राखले आहे. त्याने इंग्लंडमध्ये वनडे प्रकारात लागोपाठ धावा केल्या. टी20 क्रिकेटमध्ये तो जरा मागे असून वनडे क्रिकेटमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. यामुळे त्याचे वनडे संघात असणे आवश्यक आहे.”
“अष्टपैलू खेळाडूंची गोष्ट केली तर माझ्यामते सध्या वॉशिंग्टन सुंदर एक चांगला पर्याय आहे. तो गोलंदाजीही उत्तम करत असून जेव्हा फलंदाजी करतो तेव्हा असे वाटते पहिल्या चारमधील खेळाडूच खेळत आहे. जेव्हा संघाला फलंदाजी अष्टपैलूची आवश्यकता असली तर रविंद्र जडेजा याच्यावर येऊन शोध थांबतो. त्यानंतर अक्षर पटेल किंवा रवी अश्विन यांचा विचार केला जातो, मात्र सुंदरने त्याची जागी निर्माण केली आहे,” असेही चोप्रा यांनी पुढे म्हटले.
वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) याने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडेत 16 चेंडूत नाबाद 37 धावा केल्या होत्या. तो सामना भारताने गमावला असला तरी फिनिशर म्हणून सुंदरने चांगली भुमिका बजावली होती. त्या सामन्यात श्रेयस अय्यर (Shreyas Sundar) यानेदेखील धमाकेदार खेळी केली होती. त्याने 76 चेंडूत 80 धावा केल्या होत्या. तिसऱ्या सामन्यातही त्याने विकेट्स पडत असताना अर्धशतकी खेळी केली. त्याने 64 चेंडूत 5 चौकार आणि एका षटकारासह 51 धावा केल्या. तसेच अय्यरने 49 धावा केल्या होत्या. Shreyas Iyer & Washington Sundar should play consistently in ODIs said Aakash Chopra
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
AUSvWI: शतक करताच स्टीव्ह स्मिथने केली ब्रॅडमन यांची बरोबरी, विराट कोहली घसरला तिसऱ्या स्थानी
दर्जा! टी20 विश्वचषकात विराटने मारलेल्या ‘त्या’ दोन षटकारांचे पाकिस्तानी खेळाडूनेही केले कौतुक