भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा वनडे सामना इंदोरच्या होळकर स्टेडियमवर खेळला जात आहे. श्रेयस अय्यर पुनरागमनानंतर रविवारी (24 सप्टेंबर) आपला तिसरा वनडे सामना खेळत होता. अवघ्या 86 चेंडूत 10 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने त्याने आपले शतक पूर्ण केले. अय्यर आणि शुमबन गिल यांच्यातील मोठी भागीदारी चाहत्यांना पाहायला मिळाली.
भारताने नाणेफेक गमावल्यानंतर त्यांना प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले गेले. सलामीवीर ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याने 8 धावा करून विकेट गमावली. त्यानंतर आलेल्या श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याने सलामीवीर शुबमन गिल (Shubman Gill) याची चांगली साथ दिली. शतकी खेळी केल्यानंतर अय्यर आक्रामक खेळी करण्याच्या नादात झेलबाद झाला. भारताच्या डावातील 31व्या षटकात सीन ऍबॉट (Sean Abbott) गोलंदाजी करताना अय्यरने मॅथ्यू शॉर्ट याच्या हातात झेल दिला आणि विकेट गमावली. अय्यरने या सामन्यात 90 चेंडूत 105 धावांची खेळी केली. (Shreyas Iyer’s century in the third ODI since his comeback)
दुसऱ्या वनडेसाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत – शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक/कर्णधार), इशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा.
ऑस्ट्रेलिया – डेविड वॉर्नर, मॅथ्यू शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), मार्नस लॅब्यूशेन, जोश इंग्लिस, ऍलेक्स कॅरे (यष्टीरक्षक), कॅमरून ग्रीन, सीन ऍबॉट, ऍडम झाम्पा, जोश हेझलवूड, स्पेन्सर जॉन्सन.
महत्वाच्या बातम्या –
शुबमन-श्रेयसचे झंझावाती अर्धशतक, शतकी भागीदारीसह भारताची धावसंख्या 150च्या पार
Toss: विजय मिळवण्यासाठी ऑस्ट्रेलियाने बदलला कर्णधार, भारताच्या ताफ्यात ‘या’ खेळाडूची एन्ट्री