---Advertisement---

आईच्या गोलंदाजीवर श्रेयस अय्यर क्लीन बोल्ड! व्हायरल VIDEO एकदा पहाच

---Advertisement---

Shreyas Iyer: भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्याची तयारी करत आहे. दरम्यान काही मोठे खेळाडू या मालिकेचा भाग नाहीत, जे सध्या आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत. त्यापैकीच एक नाव स्टार फलंदाज श्रेयस अय्यरचे आहे, जो सध्या आपल्या कुटुंबासोबत मस्ती करताना दिसला. त्याने आपल्या आईसोबत क्रिकेट खेळले, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. (Shreyas Iyer viral video)

श्रेयस अय्यर इंग्लंड दौऱ्यावरील कसोटी मालिकेचा भाग नाही. त्याने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतासाठी शानदार कामगिरी केली होती आणि विजेतेपद मिळवण्यात मोलाची भूमिका बजावली होती. कसोटी संघातून वगळल्यानंतर अय्यरच्या बाजूने अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. मात्र, आता तो मुद्दा शांत झाला आहे. आयपीएलनंतर सध्या अय्यर सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. तो आपल्या घरी आईसोबत क्रिकेट खेळताना दिसला. (Shreyas Iyer playing cricket with mother)

श्रेयस अय्यरची आई त्याला गोलंदाजी करताना दिसत आहे, ज्यात तिने 2 चेंडूंमध्येच अय्यरची विकेट घेतली. यानंतर तिने आपल्या मुलाच्या विकेटचे सेलिब्रेशनही केले. सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अय्यरने आयपीएलमध्ये आपल्या नेतृत्वाने धुमाकूळ घातला. तो असा पहिला आयपीएल कर्णधार बनला आहे, ज्याने 3 वेगवेगळ्या संघांना फायनलमध्ये पोहोचवण्याचा पराक्रम केला आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---