---Advertisement---

टी२० विश्वचषकासाठी श्रीलंकेचा अंतिम १५ जणांचा संघ जाहीर; ‘या’ खेळाडूकडे कर्णधारपदाची धूरा

On: रविवार, ऑक्टोबर 10, 2021 10:13 PM
---Advertisement---

श्रीलंका क्रिकेट बोर्डच्या निवड समितीने संयुक्त अरब अमिराती आणि ओमान येथे १७ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या आयसीसी टी २० विश्वचषक २०२१ साठी श्रीलंकेच्या अंतिम १५ जणांच्या संघाची घोषणा केली आहे. या स्पर्धेसाठी श्रीलंका आणि इतर सात संघांना पात्रता फेरीत सामन्यात स्थान देण्यात आले आहे.

जून २०२१ मध्ये आयसीसीने जाहीर केले होते की, भारतातील कोविड -१९ वाढत्या चिंतेमुळे ही स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीमध्ये हलवण्यात येत आहे. ही स्पर्धा १७ ऑक्टोबर २०२१ रोजी सुरू होणार आहे, तर स्पर्धेचा अंतिम सामना १४ नोव्हेंबर २०२१ रोजी होणार आहे.

श्रीलंका संघ या स्पर्धेत पात्रता फेरीसाठी गट अ मध्ये आहे. ज्यामध्ये आयर्लंड, नामिबिया आणि नेदरलँड्स हे संघ देखील आहेत. अबुधाबीमध्ये श्रीलंकेचा पहिला सामना १८ ऑक्टोबर रोजी नामिबियाशी होणार आहे. त्यानंतर ते २० ऑक्टोबरला अबू धाबीमध्ये आयर्लंडविरुद्ध खेळतील आणि त्यांचा शेवटचा सामना २२ ऑक्टोबरला शारजामध्ये नेदरलँड्सशी होईल. या गटात पहिल्या दोन क्रमांकावर राहाणारे संघ सुपर १२ साठी निवडले जातील.

काही दिवसांपूर्वी श्रीलंकेने विश्वचषक २०२१ साठी त्यांच्या संभाव्य संघात सुरुवातीला २० खेळाडूंची नावे दिली होती. त्यानंतर त्यात अजून पाच नावे वाढविण्यात आली होती. आता अंतिम १५ जणांचा संघ निवडण्यात आला असून दासुन शनाकाला कर्णधार आणि धनंजय डी सिल्वाला उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

कुसल परेरा आणि दिनेश चंडिमल या अनुभवी जोडीलाही अंतिम संघात स्थान देण्यात आले असून युवा पथुम निसांका, अविष्का फर्नांडो, भानुका राजपक्षे यांचीही फलंदाज म्हणून निवड करण्यात आली आहे. चारिथ असलंका, वनिंदू हसरंगा आणि चमिका करुणारत्ने यांना अष्टपैलू खेळाडू म्हणून निवडण्यात आले आहे. दुशमंथा चमीरा, लाहिरू कुमारा, महेश थीक्षणा आणि अकिला धनंजया यांच्यासह बिनूरा फर्नांडो यांचीही श्रीलंका टी २० विश्वचषक २०२१ संघाची निवड केली.

टी२० विश्वचषक २०२१ साठी श्रीलंकेचे १५ सदस्यीय संघ
दासुन शनाका (कर्णधार), कुसल परेरा, दिनेश चंडीमल, धनंजय डी सिल्वा, पथुम निसांका, चरित असलंका, अविष्का फर्नांडो, भानुका राजापक्षे, चमिका करुणारत्ने, वनिंदू हसरंगा, दुशमंथा चमीरा, लाहिरू कुमझाना, अहेशका दानाजान, महेश दानाजाना बिनुरा फर्नांडो

महत्त्वाच्या बातम्या – 

प्रतिस्पर्धी चेन्नई म्हटलं की शॉची बॅट तळपतेच, पाहा खास आकडेवारी

टी२० विश्वचषकात पहिल्यांदाच होणार डीआरएसचा वापर, प्रत्येक संघाला मिळणार ‘इतके’ रिव्ह्यू

एक सर्वात युवा, तर एक वयस्कर कर्णधार, पंत-धोनीच्या नावावर पहिल्या क्लालिफायरमध्ये झाले अनोखे विक्रम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---