महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना यांच्या वतीने व पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना व डेक्कन जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एमएसएलटीए बी1आशियाई कुमार टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलींच्या गटात एकेरीत भारताच्या श्रुती अहलावत, ऑस्ट्रेलियाच्या लिली टेलर यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला. तर दुहेरीत भारताच्या रुशील खोसला व युवान नांदल, वूह्युक चांग व रिया हत्तोरी यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला.
डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या एकेरीत मुलींच्या गटात उपांत्य फेरीच्या चुरशीच्या लढतीत दुसऱ्या मानांकित भारताच्या श्रुती अहलावत हिने ऑस्ट्रेलियाच्या तिसऱ्या मानांकित इमर्सन जोन्सचा 2-6, 6-4, 7-5 असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. हा सामना २ तास ३०मिनिटे चालला. पहिल्या सेटमध्ये जोन्सने श्रुतीची दुसऱ्याच गेममध्ये सर्व्हिस रोखली व हा सेट 6-2 असा जिंकून आघाडी मिळवली. दुसऱ्या सेटमध्ये ४-१ अशा फरकाने पिछाडीवर असलेल्या श्रुतीने जोरदार कमबॅक करत सातव्या, नवव्या गेममध्ये जोन्सची सर्व्हिस ब्रेक केली व स्वतःची सर्व्हिस रोखत हा सेट 6-4 असा जिंकून सामन्यातील आपले आव्हान कायम राखले. तिसऱ्या व निर्णायक सेटमध्ये सुरुवातीला जोन्सने श्रुतीची दुसऱ्या गेममध्ये सर्व्हिस भेदली व सामन्यात २-० अशी आघाडी घेतली. पण श्रुतीने आपला खेळ उंचावत सातव्या, नवव्या, अकराव्या गेममध्ये सर्व्हिस रोखली व सामन्यात ६-५ अशी आघाडी घेतली. त्यानंतर १२व्या गेममध्ये १५-१५ असे समान गुण असताना श्रुतीने तीन बिनतोड सर्व्हिस केल्या व हा सेट ७-५ असा जिंकून विजय मिळवला.
दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या सहाव्या मानांकित लिली टेलरने तैपेईच्या अव्वल मानांकित यू-युन लीचा 6-2, असा पराभव केला. पहिला सेट लिलीने यू-युनविरुद्ध 6-2 असा जिंकून आघाडी घेतली. पण ली हिला गुडघ्याला दुखापत झाल्यामुळे सामन्यातून माघार घेतली. दुहेरीत मुलांच्या गटात उपांत्य फेरीत रुशील खोसला व युवान नांदल या भारताच्या जोडीने थायलंडच्या सिवानत औतायकुल व सुफवत साओई यांचा 4-6, 6-3, 10-5 असा तर, कोरियाच्या वूह्युक चांगने जपानच्या रिया हत्तोरीच्या साथीत शिंगो मसुदा व सतोरू नाकाजिमा यांचा 6-7(5), 6-3, 10-8 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: मुख्य ड्रॉ: एकेरी: (उपांत्य फेरी): मुली:
श्रुती अहलावत (भारत) [2]वि.वि इमर्सन जोन्स (ऑस्ट्रेलिया) [3]2-6, 6-4, 7-5;
लिली टेलर(ऑस्ट्रेलिया)[6]वि.वि.यू-युन ली (तैपेई) [1] 6-2,
दुहेरी: उपांत्य फेरी: मुले:
रुशील खोसला (भारत) /युवान नांदल (भारत) [4]वि.वि.सिवानत औतायकुल (थायलंड)/सुफवत साओई (थायलंड) 4-6, 6-3, 10-5;
वूह्युक चांग (कोरीया)[3]/ रिया हत्तोरी (जपान)वि.वि शिंगो मसुदा (जपान)/सतोरू नाकाजिमा (जपान) 6-7(5), 6-3, 10-8.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रिषभ पंतने ‘या’ लहान चाहत्याचा दिवस बनवला खास! नागपूरात पोहोचताच केलय भारी काम
“तुमच्या शब्दांनी कोणाला फरक पडत…’, भुवनेश्वर कुमारच्या पत्नीने घेतली ट्रोलर्सची क्लास
नागपूरात पोहोचताच विराट धडकला शार्कच्या घरी! फोटोच्या कॅप्शनने वेधलेय लक्ष