भारतीय संघ जगात सर्वोत्तम मानला जातो, यात मुख्य योगदान खेळाडूंचे आहेच तसेच या यशाचे श्रेय संघ व्यवस्थापनालाही जाते. योग्य खेळाडूंची निवड करून त्यांना योग्य ठिकाणी संधी देवून संघ मजबूत होत असतो. मागील काही वर्षात श्रेयस अय्यर, पृथ्वी शॉ, टी नटराजन यांना संधी देवून व्यवस्थापनाने भारतीय संघाला आणखी मजबूत केले आहे. मात्र, अशा परिस्थितीत मागील एक वर्षापासून कसोटी संघात असलेल्या युवा फलंदाजाला अजूनही पदार्पणाची संधी मिळालेली नाही.
पदार्पणाची वाट पाहतोय शुबमन गिल
युवा फलंदाज शुबमन गिल मागील १५ महिन्यांपेक्षा जास्त कालावधीपासून भारतीय कसोटी संघात आहे. मात्र त्याला अजूनही पदार्पणाची संधी मिळालेली नाही. मायदेशातील दक्षिण आफ्रिका विरुद्ध झालेल्या मालिकेत रोहित शर्माने कसोटी संघात पुनरागमन केले व सलामीला फलंदाज करण्यास सुरुवात केली. रोहितच्या उत्तम कामगिरीमुळे गिलसाठी पदार्पण करणे अवघड ठरले आहे. गिलने २०१९ साली आपले वनडे पदार्पण केले होते. मात्र, वनडेतही त्याला पुरेशा संधी मिळालेल्या नाहीत.
स्थानिक क्रिकेटमध्ये केली आहे उत्तम कामगिरी
गिलने २२ प्रथमश्रेणी सामन्यांत ६९ पेक्षा अधिक सरासरीने २१६२ धावा केलेल्या आहेत. या धावा करताना त्याने ७ शतके आणि १० अर्धशतकेही ठोकली आहेत. याच उत्तम कामगिरीच्या बळावरच त्याची भारतीय संघात निवड झाली होती.
विराट कोहलीच्या अनुपस्थितीत मिळू शकते संधी
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळल्यानंतर विराट कोहली पालकत्व रजा घेवून भारतात परतणार आहे. विराटच्या अनुपस्थितीत गिलला संघात संधी द्यावी, अशी मागणी काही क्रिकेट पंडितांकडून केली जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
तब्बल १० खेळाडू कसोटी मालिकेपूर्वी परतणार भारतात, पाहा संपूर्ण यादी
विराट! शेतकरी मोर्चात सहभागी हो, चिडून चाहत्याने केले आवाहन
पाकिस्तान क्रिकेटला अच्छे दिन, तब्बल १४ वर्षांनी ‘हा’ संघ करणार पाकिस्तान दौरा
ट्रेंडिंग लेख-
शाहरुख खानच्या ५ क्रिकेटवरील जाहिराती, ज्यांनी एकवेळी घातला होता धुमाकूळ
अठरा वर्षांची ‘छोटीशी’ क्रिकेट कारकीर्द खेळलेला ‘पार्थिव पटेल’
अवघ्या अठराव्या वर्षी पार्थिव पटेल खेळला चक्क विश्वचषक; वाचा कशी झाली कारकिर्दीची सुरुवात