fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

या कारणांमुळे झाली शुबमन गिलची टीम इंडियात निवड

भारताचा प्रभावशाली युवा फलंदाज शुबमन गिलची काल(13 जानेवारी) केएल राहुल ऐवजी न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड झाली आहे. त्याने मागील काही महिन्यांपासून देशांतर्गत स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे.

तसेच त्याने मागीलवर्षी झालेल्या भारताकडून 19 वर्षांखालील विश्वचषक विजयातही मोलाची कामगिरी केली होती. यामुळे त्याला आयपीएल आणि भारत अ संघातही स्थान मिळाले आहे आणि आता त्याने भारताच्या वरिष्ठ संघातही स्थान मिळवले आहे.

पण त्याची निवड होण्यामागे काही कारणे होती. यात त्याला त्याच्या नशीबाबरोबरच त्याच्या मागील काही महिन्यातील सामन्यांमधील कामगिरीचीही मदत झाली आहे.

केएल राहुल आणि हार्दिक पंड्याला त्यांनी कॉफी विथ करन या शोमध्ये महिलांबद्दल केलेल्या विवादात्मक विधानांमुळे बीसीसीआयने निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे भारतीय संघात सलामीवीरासाठी जागा रिक्त झाली होती. त्यामुळे शुबमनला सलामीवीर म्हणून भारतीय संघात स्थान मिळाले आहे.

या जागेसाठी भारताकडे पृथ्वी शॉ आणि मयंक अगरवाल यांचा पर्याय होता. पण शॉला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेआधी सराव सामन्यात घोट्याची दुखापत झाली होती. तो अजून त्या दुखापतीतून सावरत आहे.

तसेच अगरवाललाही ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेत छोटी दुखापत झाली आहे. त्यामुळे या दोघांना न्यूझीलंड विरुद्ध संधी देण्यात आलेली नाही.

तसेच शुबमनसाठी ही गोष्ट पथ्यावर जरी पडली असली तरी त्याची देशांतर्गत क्रिकेटमध्ये कामगिरीही खूप चांगली झाली आहे. सध्या सुरु असलेल्या रणजी ट्रॉफी स्पर्धेतही त्याने 9 डावात 104 च्या सरासरीने 728 धावा केल्या आहेत. यात त्याने तमिळनाडू विरुद्ध मोहालीत 268 धावांची द्विशतकी खेळी केली होती.

त्याआधी 2014 मध्ये  16 वर्षाँखालील पंजाब इंटर डिस्ट्रिक्ट स्पर्धेत 351 धावांची त्रिशतकी खेळी केली होती. त्याचबरोबर निर्मल सिंगबरोबर 587 धावांची सलामी भागीदारीही केली होती. त्याला बीसीसीआयने 2013-14 आणि 2014-15 मध्ये सर्वोत्तम ज्यूनियर क्रिकेटपटूचा पुरस्कारही दिला होता.

त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत 9 सामन्यात 77.28 च्या सरासरीने 1089 धावा केल्या आहेत. तसेच अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये 36 सामन्यात 47.78 सरासरीने 1529 धावा केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

या कारणामुळे किंग कोहली कांगारूंना नडणार…

दुसऱ्या वनडेसाठी या खेळाडूंना मिळू शकते अंतिम ११ जणांच्या टीम इंडियात संधी

कांगारूंच्या भूमीत कांगारुंच्या महान खेळाडूचा विक्रम मोडणार रोहित

 

You might also like