युवा भारतीय फलंदाज शुबमन गिलने मुंबई कसोटीत भारताच्या पहिल्या डावात चमकदार कामगिरी केली. त्याने 90 धावांची खेळी खेळली. उत्कृष्ट खेळीनंतर गिलचे शतक थोडक्यात हुकले. असे असूनही त्याने एका विशेष यादीत स्थान मिळवले. गिलने 2024 मध्ये 800 कसोटी धावा पूर्ण केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा तो जगातील सहावा फलंदाज ठरला. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे.
भारताच्या पहिल्या डावात गिल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. त्याने 146 चेंडूंचा सामना करत 90 धावा केल्या. गिलने 7 चौकार आणि 1 षटकार मारला. या खेळीमुळे त्याने या कॅलेंडर वर्षात 800 कसोटी धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा गिल हा भारताचा दुसरा आणि जगातील सहावा फलंदाज आहे. यशस्वी जयस्वालने भारतासाठी 2024 मध्ये 800 हून अधिक कसोटी धावा केल्या आहेत.
या वर्षी सर्वाधिक कसोटी धावा करणाऱ्या यशस्वी दुसऱ्या स्थानावर आहे. भारतीय खेळाडूंच्या यादीत तो पहिल्या क्रमांकावर आहे. यशस्वीने 11 कसोटी सामन्यांमध्ये 1114 धावा केल्या आहेत. या काळात त्याने दोन शतके आणि सात अर्धशतके झळकावली. यशस्वीने द्विशतकही केले आहे. तर गिलने 10 कसोटी सामन्यात 805 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने 3 शतके आणि 3 अर्धशतके केली आहेत. नाबाद 119 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे.
भारतीय संघाने पहिल्या डावात न्यूझीलंडला 235 धावांवर सर्वबाद केले होते. प्रत्युत्तरात भारताने पहिल्या डावात 263 धावा केल्या. भारताकडून गिल आणि रिषभ पंत यांनी अर्धशतके झळकावली. पंतने 60 धावांची खेळी केली. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनीही आपली ताकद दाखवली आहे. दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस न्यूझीलंडने आपले नऊ गडी गमावले असून, त्यांच्याकडे 143 धावांची आघाडी आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
IPL 2025; पंजाब किंग्ज बनणार सर्वात मजबूत संघ, नवीन प्रशिक्षकाचे मोठे वक्तव्य!
रिषभ पंतवर भडकला रोहित शर्मा, VIDEO होतोय जोरदार व्हायरल
IND vs NZ; मुंबई कसोटीत भारताचे वर्चस्व! दुसऱ्याच दिवशी न्यूझीलंडचे 9 गडी तंबूत