भारत विरूद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघातील 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा कसोटी सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगला आहे. पण या सामन्यातही भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माची (Rohit Sharma) बॅट शांत राहिली आहे. भारताच्या पहिल्या डावात रोहितला केवळ 18 धावा करता आल्या. तत्पूर्वी रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि रिषभ पंत (Rishabh pant) दोन्ही खेळाडूंचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
रोहित शर्माची रणनीती आणि घेतलेले निर्णय न्यूझीलंडच्या पहिल्या डावात योग्य ठरले. त्यामुळेच पाहुण्या संघाला पहिल्या डावात 235 धावात रोखण्यात भारतीय गोलंदाजांना यश आले. या सामन्यादरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) रिषभ पंतवर (Rishabh Pant) रागाने ओरडताना दिसत आहे.
सोशल मीडियावर समोर आलेला हा व्हिडिओ मुंबई कसोटीच्या पहिल्या दिवसाचा असल्याचे सांगण्यात येत आहे. या व्हिडिओमध्ये रोहित काही कारणास्तव ड्रेसिंग रूममध्ये पंतला रागाने काहीतरी म्हणत असल्याचे दिसत आहे. पंतही रोहितला स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करताना दिसला, पण कदाचित रोहित त्याचे ऐकायला तयार नव्हता. या व्हिडिओमागील सत्य काय आहे? हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
— Drizzyat12Kennyat8 (@45kennyat7PM) November 2, 2024
रिषभ पंतने (Rishabh Pant) मुंबई कसोटीत चमकदार कामगिरी केली. त्याने 59 चेंडूंत 60 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. दरम्यान त्याने 8 चौकारांसह 2 षटकार ठोकले. शुबमन गिलसोबत (Shubman Gill) त्याने पाचव्या विकेटसाठी 96 धावांची भागीदारी केली. भारताने पहिल्या डावात 268 धावा केल्या आणि 33 धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत न्यूझीलंडने 9 गडी गमावून 171 धावा केल्या. न्यूझीलंडकडे आता 1 विकेट शिल्लक असून 143 धावांची आघाडी आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
IPL 2025; पंजाब किंग्ज बनणार सर्वात मजबूत संघ, नवीन प्रशिक्षकाचे मोठे वक्तव्य!
IND vs NZ; मुंबई कसोटीत भारताचे वर्चस्व! दुसऱ्याच दिवशी न्यूझीलंडचे 9 गडी तंबूत
वयाच्या 25व्या वर्षापर्यंत सर्वाधिक वेळा 90 धावांच्या जाळ्यात फसले ‘हे’ 5 भारतीय खेळाडू