---Advertisement---

चौथ्या डावात विदेशात नव्वदीत बाद होणारा गिल ठरला चौथा भारतीय, पाहा कोण आहेत अन्य तीन खेळाडू

On: मंगळवार, जानेवारी 19, 2021 11:12 AM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान ब्रिस्बेन येथे सुरू असलेल्या मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यात दोन्ही संघांमध्ये उत्तम संघर्ष बघायला मिळत आहे. सामन्याच्या पाचव्या दिवशी 328 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा युवा सलामीवीर शुभमन गिलने शानदार 91 धावांची खेळी केली. मात्र त्याचे कारकिर्दीतील पहिले कसोटी शतक केवळ 9 धावांनी हुकले. त्यामुळे त्याला एका नकोशा विक्रमाच्या यादीत समावेश झाला आहे.

या सामन्यात आक्रमक अंदाजात खेळणाऱ्या गिलने चेतेश्वर पुजारासह शतकी भागीदारी रचली होती. त्यावेळी तो आता शतकही पूर्ण करेल असे वाटत असतानाच तो नॅथन लायनच्या फिरकीच्या जाळ्यात अडकला. लायनने डावातील 48 व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर गिलला बाद केले. गिलचा झेल स्लीपमध्ये उभ्या असलेल्या स्टिव्ह स्मिथने घेतला. त्यामुळे गिलला 91 धावांवर विकेट गमवावी लागली.

त्यामुळे गिल हा परदेशात कसोटीच्या चौथ्या डावात नव्वदीत (90 ते 99 धावांदरम्यान) बाद होणारा चौथा भारतीय फलंदाज ठरला आहे. गिल पूर्वी मुरली विजय 2014 साली ॲडीलेड येथे 99 धावांवर बाद झाला होता. नवज्योत सिंग सिद्धू हॅमिल्टन येथे 98 धावांवर बाद झाला होता. तसेच गिलचा संघसहकारी रिषभ पंत सिडनी येथे झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात 97 धावांवर बाद झाला होता.

गिलने या डावाच 146 चेंडूंचा सामना करत 8 चौकार व 2 खणखणीत षटकारांसह 91 धावांची खेळी केली. दरम्यान शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा भारताने 72 षटकात 3 गडी गमावत 208 धावांपर्यंत मजल मारली होती. भारताला अजूनही विजयासाठी 119 धावांची आवश्यकता असून रिषभ पंत व चेतेश्वर पुजारा मैदानात खेळत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

‘एक हजारी’ रिषभ पंत; एमएस धोनीसारख्या भारतीय दिग्गजालाही टाकलं मागं

लहान वय असले तरी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना घाम फोडणारे युवा फलंदाज, दोन आहेत भारतीय 

‘गिल है की मानता नही!’ विरूकडून खास अंदाजात शुबमनचं कौतुक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---