---Advertisement---

२० वर्षीय शुबमन गिलने बड्डे बॉय विराटला मागे टाकत या यादीत मिळवले अव्वल स्थान…

On: मंगळवार, नोव्हेंबर 5, 2019 5:27 PM
---Advertisement---

सोमवारी (4 नोव्हेंबर) जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडीयम, रांची येथे इंडिया ‘बी’ आणि इंडिया ‘सी’ (India C vs India B) संघात देवधर ट्राॅफी ( Deodhar Trophy 2019-20 ) स्पर्धेतील अंतिम सामना पार पडला. या सामन्यात इंडिया ‘बी’ संघ 51 धावांनी विजयी झाला.

या सामन्यात  इंडिया ‘सी’ संघाचे नेतृत्व 20 वर्षीय शुबमन गिलने (Shubman Gill) केले होते. त्यामुळे तो देवधर ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात नेतृत्व करणारा सर्वात युवा कर्णधार ठरला आहे. देवधर ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात नेतृत्व करताना शुबमनचे वय 20 वर्षे 57 दिवस होते.

यापूर्वी हा विक्रम विराट कोहलीच्या नावावर होता. कोहलीने 2009 – 10मध्ये झालेल्या देवधर ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात नाॅर्थ झोनचे नेतृत्व केले होते. त्यावेळी त्याचे वय 21 वर्षे 124 दिवस इतके होते.

सोमवारी झालेल्या अंतिम सामन्यात शुबमन इंडिया ‘सी’ संघासाठी चांगले योगदान देऊ शकला नाही. शुबमन 1 धाव करून डावाच्या दुसऱ्या षटकात मोहम्मद सिराजच्या चेंडूवर यशस्वी जयस्वालकडून झेलबाद झाला.

या सामन्यात इंडिया ‘बी’ संघाने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. नाणेफेक जिंकत इंडिया ‘बी’ संघाने प्रथम फलंदाजी करताना 7 बाद 283 धावा केल्या.

इंडिया ‘बी’ संघाकडून खेळताना केदार जाधवने(Kedar Jadhav) सर्वाधिक 86, यशस्वी जयस्वालने (Yashasvi Jaiswal) 54 आणि विजय शंकरने (Vijay Shankar) 45 धावा केल्या. इंडिया ‘सी’कडून गोलंदाजी करताना ईशान पोरलने (Ishan Porel) सर्वाधिक 5 विकेट घेतले.

यानंतर विजयासाठी 284 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या इंडिया ‘सी’ संघाला निर्धारित 50 षटकांत 9 बाद 232 धावाच करता आल्याने 51 धावांनी सामना पराभूत व्हावे लागले.

इंडिया ‘सी’ कडून खेळताना प्रियम गर्गने (Priyam Garg) सर्वाधिक 74 धावा केल्या. तर, अक्षर पटेलने (Axar Patel) 38 तर जलाज सक्सेनाने (Jalaj Saxena) 37 धावा केल्या. तसेच इंडिया ‘बी’कडून गोलंदाजी करताना शाहबाज नदीमने (Shahbaz Nadeem) सर्वाधिक 4, मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) 2 आणि रूष कलरियाने (Roosh Kalaria) 1 विकेट घेतली.

देवधर ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात नेतृत्व करणारे सर्वात युवा कर्णधार – 

20 वर्ष 57 दिवस – शुभमन गिल – इंडिया ‘सी’ (2019-20)

21 वर्ष 124 दिवस – विराट कोहली – नॉर्थ झोन (2009-10)

22 वर्ष 310 दिवस – उन्मुक्त चंद – इंडिया ‘बी’ (2015-16)

23 वर्ष 92 दिवस – श्रेयस अय्यर – इंडिया ‘बी (2017-18)

23 वर्ष 124 दिवस – मनोज तिवारी – ईस्ट झोन (2008-09)

23 वर्ष 305 दिवस – कपिल देव – नॉर्थ झोन (1982-83)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---