---Advertisement---

असं करणं अशक्यच! शुभमन गिलनं मागे धावत जाऊन घेतला अविश्वसनीय झेल, VIDEO एकदा पाहाच

---Advertisement---

दुलीप ट्रॉफी 2024 चा पहिला सामना भारत ‘अ’ आणि भारत ‘ब’ यांच्यात बंगळुरू येथे खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाचे स्टार खेळाडू यशस्वी जयस्वाल, रिषभ पंत आणि शुभमन गिल देखील खेळत आहेत.

सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारत ‘ब’ संघाची सुरुवात खराब झाली. संघानं 94 धावांच्या स्कोअरवर 7 विकेट गमावल्या. या सामन्यात स्टार फलंदाज रिषभ पंतनं चाहत्यांना निराश केलं. तो अवघ्या 7 धावा करून बाद झाला. मात्र रिषभ पंतची विकेट पडण्यामागे एका भारतीय खेळाडूचा मोठा वाटा होता. हा खेळाडू आहे युवा सलामीवीर शुबमन गिलं.

वास्तविक, इंडिया ‘ब’ संघाच्या डावात आकाश दीप 36वं षटक टाकत होता. षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर रिषभ पंतनं हवेत एक शॉट खेळला. चेंडू बराच उंच गेला होता. मात्र खाली उभ्या असलेल्या शुबमन गिलनं चेंडूकडे उलट्या दिशेनं धाव घेत डाईव्ह मारत अत्यंत अवघड झेल घेतला. शुबमन गिलचा हा झेल खूपच उत्कृष्ट होता. या झेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर लगेच व्हायरल झाला आहे. चाहते यावर कमेंट करून गिलची स्तुती करत आहेत.

 

आगामी कसोटी मालिकांसाठी तयारी म्हणून भारताचे अनेक स्टार खेळाडू दुलीप ट्रॉफीमध्ये खेळत आहेत. यशस्वी जयस्वाल आणि रिषभ पंत इंडिया ‘ब’ संघाचा हिस्सा आहेत. अभिमन्यू ईश्वरन या संघाचा कर्णधार आहे. तर शुबमन गिल हा इंडिया ‘अ’ संघाचा कर्णधार आहे.

सामन्यात ‘अ’ संघानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ‘ब’ संघाकडून यशस्वी जयस्वाल सलामीला आला. मात्र तो केवळ 30 धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर बाद झाला. यानंतर पंत पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. पण त्यालाही विशेष काही करता आलं नाही. तो 10 चेंडूत 7 धावा करून बाद झाला.

हेही वाचा – 

जोस बटलर दुखापतीमुळे बाहेर, इंग्लंडला मिळाला नवा टी20 कर्णधार
स्टार भारतीय क्रिकेटपटूची राजकारणात एंट्री, या पक्षाची सदस्यता स्वीकारली
टीम इंडिया सावध राहा, बांगलादेश देऊ शकतो ‘जोर का झटका’!

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---