---Advertisement---

१९ वर्षीय शुबमन गिलने शानदार अर्धशतकासह आयपीएलमध्ये केला मोठा पराक्रम

On: शनिवार, मे 4, 2019 3:22 PM
---Advertisement---

मोहाली। शुक्रवारी(3 मे) आयपीएल 2019 मध्ये किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध कोलकता नाईट रायडर्स संघात 51 वा सामना पार पडला. या सामन्यात कोलकताने 7 विकेट्सने विजय मिळवत प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. कोलकताच्या या विजयात शुबमन गिलने अर्धशतकी खेळी करत मोलाचा वाटा उचलला.

या सामन्यात पंजाबने कोलकता समोर विजयासाठी ठेवलेल्या 184 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गिल सलामीला फलंदाजीला आला होता. त्याने सुरुवातीपासून चांगला खेळ करताना 49 चेंडूत 65 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 5 चौकार आणि 2 षटकार मारले. याबरोबरच त्याने खास विक्रम केला आहे.

गिलचे हे आयपीएलमधील चौथे अर्धशतक आहे. त्यामुळे वयाची 20 वर्षे पूर्ण करण्याआधी आयपीएलमध्ये 4 अर्धशतके करणारा तो पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. या आधी संजू सॅमसन, रिषभ पंत, इशान किशन आणि पृथ्वी शॉ यांनी वयाची 20 वर्षे पूर्ण करण्याआधी प्रत्येकी 3 अर्धशतके केली आहेत. गिल सध्या 19 वर्षांचा आहे.

त्याने या आयपीएल मोसमात चांगली कामगिरी करताना आत्तापर्यंत 13 सामन्यात 3 अर्धशतकांसह 287 धावा केल्या आहेत.

शुक्रवारी झालेल्या सामन्यात पंजाबने प्रथम फलंदाजी करताना अष्टपैलू क्रिकेटपटू सॅम करनने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर 20 षटकात 6 बाद 183 धावा केल्या. करनने 24 चेंडूत नाबाद 55 धावांची खेळी केली. तसेच पंजाबकडून निकोलस पूरनने 48 धावांची चांगली खेळी केली.

कोलकताकडून गोलंदाजीत संदिप वॉरियरने 2, तर आंद्रे रसल आणि नितिश राणाने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

त्यानंतर 184 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या कोलकताकडून गिल बरोबरच ख्रिस लिनने 46 धावांची चांगली खेळी केली. कोलकाताने हे आव्हान 18 षटकातच 3 विकेट्सच्या मोबदल्यात सहज पूर्ण केले. पंजाबकडून गोलंदाजीत मोहम्मद शमी, अँड्र्यू टाय आणि आर अश्विनने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

महत्त्वाच्या बातम्या –

–अजिंक्य रहाणे पुन्हा करणार राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व…

–न्यूझीलंड ओपन: एचएस प्रणॉयचा उपांत्यपूर्व फेरीत पराभव, भारताचेही आव्हान संपुष्टात

–‘गोलंदाजांनी तूला कुठे चेंडू टाकायचा?’ बुमराहचा पंड्याला प्रश्न; पहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment