Shubman Gill Record: सध्या भारत आणि इंग्लंड संघातील दुसरा कसोटी सामना एजबॅस्टनच्या मैदानावर रंगला आहे. सध्या हा सामना रोमांचक वळणावर आहे. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी दमदार फलंदाजी केली आहे. या सामन्यादरम्यान भारतीय संघाचा कर्णधार शुबमन गिलने एक नाव इतिहास रचला आहे. त्याने 55 वर्ष जुना रेकाॅर्ड मोडत ऐतिहासिक कामगिरी केली.
दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात 80 धावा करताच शुबमन गिलने मोठा पराक्रम केला. गिल भारतासाठी एका कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. याआधी हा रेकाॅर्ड माजी दिग्गज क्रिकेटर सुनील गावस्कर यांच्या नावावर होता. गावस्करांनी 1971 मध्ये वेस्ट इंडिजविरूद्ध एका कसोटी सामन्यात 344 धावा करत हा रेकाॅर्ड केला होता. परंतु, गिलने हा रेकाॅर्ड मोडत इतिहास रचला. गिलने एका कसोटीत 345 धावा केल्या आहेत. दरम्यान तो अजूनही क्रिजवर फलंदाजी करतोय.
एक कसोटीत भारतासाठी सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत शुबमन गिल पहिल्या स्थानावर आहे, त्याने एका कसोटी सामन्यात 345 धावा केल्या आहेत. दुसऱ्या स्थानावर माजी दिग्गज सुनील गावस्कर आहेत, त्यांनी एका कसोटीत 344 धावा केल्या आहेत, तर तिसऱ्या स्थानावर व्हीव्हीएस लक्ष्मण आहे, त्याने ऑस्ट्रेलियाविरूद्ध 2001 मध्ये 340 धावा केल्या होत्या. या यादीत शेवटच्या स्थानावर सौरव गांगुली आहे. गांगुलीने 2007 मध्ये पाकिस्तान विरूद्ध एका कसोटी सामन्यात 300 धावा करण्याचा पराक्रम केला होता.
एका कसोटीत भारतासाठी सर्वाधिक धावा
345 धावा, शुबमन गिल विरूद्ध इंग्लंड 2025
344 धावा, सुनील गावस्कर विरूद्ध वेस्ट इंडिज 1971
340 धावा, व्हीव्हीएस लक्ष्मण विरूद्ध ऑस्ट्रेलिया 2001
330 धावा, सौरव गांगुली विरूद्ध पाकिस्तान 2007






