भारतीय संघाचा सलामीवीर शुभमन गिलने नुकतेच विधान केले आहे की, न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाने परिपूर्ण तयारी केली आहे. परंतु गिल असेही म्हणाला की इंग्लंडच्या परिस्थितीत प्रत्येक सत्राकडे लक्ष देणे महत्वाचे ठरेल. गिल भारतीय संघाच्या अन्य खेळाडूंसोबत मुंबईत 14 दिवसांसाठी क्वारंटाइनमध्ये आहे. दरम्यान, गिलने कर्णधार विराट कोहली आणि अनुभवी खेळाडू रोहित शर्माबद्दल एक मोठे वक्तव्य केले आहे.
गिलने एका मुलाखतीत भारतीय संघाबरोबर घालवलेला वेळ तसेच कर्णधार विराट कोहली आणि सलामीवीर रोहित शर्मा यांच्याविषयी भाष्य केले आहे. गिल म्हणाला, “जेव्हा जेव्हा विराट भाई माझ्याशी खेळाबद्दल बोलतात, तेव्हा ते मला दबाव न घेता खेळण्यास सांगतात. ते मानसिकतेबद्दल खूप बोलतात आणि आपले अनुभव सांगतात.”
गिल रोहित बद्दल बोलताना म्हणाला, “जेव्हा मी रोहित शर्मा बरोबर फलंदाजी करतो तेव्हा सहसा गोलंदाज कोठे गोलंदाजी करेल, काय परिस्थिती आहे आणि त्या आधारावर आपण धोका केव्हा घ्यावा आणि घेऊ नये, याबद्दल बोलतो.”
क्वारंटाइनबद्दल बोलताना शुभमन गिल म्हणाला, ‘हे खूप कठीण आहे. तुम्हाला 14 दिवस एका खोलीत रहावे लागेल आणि तुमच्याकडे करण्यासाठी काही विशेष नसते. आम्हाला दररोजचे वेळापत्रक देण्यात आले आहे. आम्ही त्यानुसार नियोजन करतो. आम्ही स्वत: ला चित्रपट पाहण्यात व्यस्त ठेवतो किंवा आयपॅडवर थोडा वेळ घालवतो, परंतु एकूणच हे खूप कठीण आहे.”
भारताच्या इंग्लंड दौऱ्याबद्दल बोलायचे झाल्यास हा दौरा भारतीय संघासाठी अतिशय महत्तवपूर्ण असणार आहे. भारतीय संघ या दौऱ्यात 18 ते 22 जून दरम्यान न्युझीलंड विरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळणार आहे. यानंतर भारतीय संघ ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये इंग्लंड विरुद्ध 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. या संपूर्ण इंग्लंड दौऱ्यासाठी गिलची भारतीय संघात निवड झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
बीसीसीआयची पुन्हा नाचक्की! १० वर्षांपूर्वी आयपीएल खेळलेल्या खेळाडूला मिळाले नाहीत पैसे