---Advertisement---

कमाल लाजवाब…! गिलचा हा अफलातून षटकार बघून तुम्हीही असंच म्हणाल, पाहा व्हिडिओ

On: रविवार, एप्रिल 11, 2021 11:56 PM
---Advertisement---

चेन्नई येथील चेपॉक स्टेडियमवर झालेल्या आयपीएल २०२१ च्या तिसऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादचा १० धावांनी पराभव करत स्पर्धेत विजयी सुरुवात केली. सांघिक कामगिरीच्या बळावर केकेआरने हैदराबादला नमविण्यात यश मिळवले. या सामन्यात केकेआरचा सलामीवीर शुबमन गिलने ठोकलेल्या एका षटकाराने सर्वांची वाहवा मिळवली.

गिलचा लाजवाब षटकार
केकेआरसाठी या सामन्यात नितीश राणा व शुबमन गिल यांनी डावाची सुरुवात केली. राणा पहिल्या षटकापासूनच आक्रमकपणे खेळत होता. दुसरीकडे गिल आपला वेळ घेताना दिसला. मात्र, डावातील पाचवे षटक टाकण्यासाठी टी नटराजन आला. षटकातील पहिल्याच चेंडूला सामोरे जात, गिलने लॉंग ऑनला अप्रतिम षटकार ठोकला. हा षटकार पाहून चाहत्यांच्या तोंडून कौतुकाचे शब्द आपोआप बाहेर पडले. त्याच्या षटकाराचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. गिलने राशिद खानच्या चेंडूवर बाद होण्यापूर्वी १३ चेंडूत प्रत्येकी एक चौकार व एका षटकाराच्या मदतीने १५ धावा केल्या.

https://twitter.com/QuickWristSpin/status/1381251955704487937?s=19

केकेआरची विजयी सुरुवात
या सामन्यात नाणेफेक गमावून केकेआरला प्रथम फलंदाजी करावी लागली. नितीश राणा (८०) व राहुल त्रिपाठी (५४) यांनी दुसऱ्या गड्यासाठी ९३ धावांची भागीदारी केली. राशिद खान व मोहम्मद नबीने सलगपणे तीन बळी मिळवल्याने केकेआरच्या धावसंख्येला काहीसा लगाम बसला. मात्र, अखेरीस दिनेश कार्तिकने ९ चेंडूत २२ धावा ठोकून केकेआरला १८७ पर्यंत मजल मारून दिली.

प्रत्युत्तरात, सनरायझर्स हैदराबादची सुरुवात अत्यंत खराब झाली. कर्णधार डेव्हिड वॉर्नर व वृद्धिमान साहा हे झटपट माघारी परतले. तिसऱ्या गड्यासाठी मनीष पांडे व जॉनी बेअरस्टोने ९२ धावा जोडल्या. अर्धशतकानंतर बेअरस्टोने लगेच बाद झाला. पांडे व युवा अब्दुल समद यांनी विजयासाठी शर्थीचे प्रयत्न केले. परंतु, हे प्रयत्न १० धावांनी तोकडे पडले व केकेआरने विजय संपादन केला.

महत्त्वाच्या बातम्या –

नाडादेखील आयपीएलसाठी सज्ज, इतक्या खेळाडूंची घेणार डोपिंग चाचणी

तब्बल ‘इतक्या’ दिवसांनंतर मैदानात उतरला भज्जी, सहकाऱ्यांनी केले कौतुक

बधाई हो भज्जी! आयपीएलमध्ये ‘अशी’ कामगिरी करणारा बनला एकमेव क्रिकेटपटू

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---