न्यूझीलँड । १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकात भारतीय संघाची विजयी घोडदौड कायम आहे. आज भारतीय संघाने झिम्बाब्वे संघावर तब्बल १० विकेट्सने विजयी मिळवला.
झिम्बाब्वे संघाने आज नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताकडून आज तब्बल ७ गोलंदाजांनी गोलंदाजी केली. त्यात ५ गोलंदाजांना विकेट घेण्यात यश आले.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या झिम्बाब्वेने ४८.१ षटकांत १५४ धावा केल्या.
हे लक्ष घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने षटकांत एकही विकेट न गमावता धावा करत १० विकेट्सने विजय मिळवला. त्यात शुभम गिल ५९ चेंडूत ९० नाबाद आणि हरविक देसाईने ७३ चेंडूत ५६ नाबाद धावा केल्या.
या विजयाबरोबर भारतीय संघ पुढच्या फेरीसाठी पात्र ठरला आहे.
१९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकात सलग दोन सामने १० विकेट्सने जिंकणारा भारतीय संघ इंग्लंडनंतर केवळ दुसरा संघ ठरला आहे.