2025च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी (ICC Champions Trophy) भारतीय संघाची घोषणा झाली आहे. भारतीय संघ रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली मैदानात उतरताना दिसेल. या स्पर्धेसाठी उपकर्णधार म्हणून युवा प्रतिभावान खेळाडू शुबमन गिलची (Shubman Gill) निवड करण्यात आली आहे. त्यामुळे गिल या मेगा स्पर्धेत भारतासाठी मोठी जबाबदारी सांभाळताना दिसणार आहे.
वास्तविक भारतीय संघात हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) सारखे वरिष्ठ खेळाडू असूनही शुबमन गिलला (Shubman Gill) उपकर्णधार का बनवण्यात आले? याबद्दल सतत चर्चा सुरू आहे. त्यावर मुख्य निवडकर्ता अजित आगरकर (Ajit Agarkar) यांनी या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत आणि निवडकर्त्यांनी गिलला भारताच्या वनडे संघाचा उपकर्णधार का बनवले आहे हेदेखील सांगितले आहे.
शुबमन गिलला (Shubman Gill) भारताच्या वनडे संघाचा उपकर्णधार बनवण्याबाबत अजित आगरकर म्हणाले की, “गिल यापूर्वी श्रीलंका दौऱ्यावर उपकर्णधार होता. मला याबद्दल जास्त बोलायचे नाही. ड्रेसिंग रूममधून खूप प्रतिक्रिया येत आहेत. तुम्हाला नेहमीच तुमचे पर्याय खुले ठेवायचे असतात”
पत्रकार परिषदेत पुढे बोलताना आगरकर म्हणाले, “एक आव्हान म्हणजे आजकाल फारसे खेळाडू त्यांच्या राज्य संघांचे नेतृत्व करत नाहीत. पण तुम्ही नेहमीच अशा व्यक्तीच्या शोधात असता ज्याच्याकडे नेतृत्वगुण आहेत.”
महत्त्वाच्या बातम्या-
चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग 11?
जसप्रीत बुमराहचे चॅम्पियन्स ट्राॅफीमध्ये खेळणे नाही निश्चित! रोहित शर्माचे मोठे वक्तव्य
Champions Trophy; ‘या’ 3 कारणांमुळे मोहम्मद सिराजला भारतीय संघातून वगळले