अबु धाबीच्या शेख जायेद स्टेडियममध्ये गुरुवारी (२३ सप्टेंबर) मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पहायला मिळाला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने ७ गडी राखून विजय मिळवला. या विजयासह कोलकाता नाईट रायडर्स संघाने २ गुणांची कमाई करत आयपीएल स्पर्धेच्या गुणतालिकेत चौथे स्थान पटकावले आहे. दरम्यान या संघातील सलामीवीर फलंदाज शुबमन गिलने एक अप्रतिम शॉट मारला आहे, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
शुबमन गिल आणि व्यंकटेश अय्यर यांची जोडी सध्या कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी महत्वाची भूमिका पार पाडत आहे. मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात व्यंकटेश अय्यरने अर्धशतक झळकावून संघाला विजय मिळवून दिला. तर शुबमन गिल या सामन्यात मोठी खेळी करू शकला नाही. तो ९ चेंडूंमध्ये १३ धावा करत माघारी परतला. परंतु या छोट्या खेळीदरम्यान त्याने एक अप्रतिम षटकार मारला होता, ज्याची तुलना आता थेट विराट कोहलीच्या षटकारसोबत केली जात आहे.
शुबमन गिलला भारतीय क्रिकेटचे भविष्य समजले जाते. अनेकांनी असेही म्हटले आहे की, तो येणाऱ्या काळात विराट कोहलीचे विक्रम मोडू शकतो. या गोष्टी येणाऱ्या काळात घडतीलच. दरम्यान मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने हुबेहूब विराट कोहली सारखाच षटकार मारला आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाची फलंदाजी सुरू असताना, पहिल्याच षटकातील दुसऱ्या चेंडूवर शुबमन गिलने पुढे येऊन अप्रतिम फ्लिक शॉट मारला होता, जो बॅटला लागताच सीमारेषेच्या बाहेर जाऊन पडला.
https://twitter.com/kishore__msd/status/1441077801616961544?s=20
असाच षटकार विराट कोहलीने ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध झालेल्या टी-२० मालिकेदरम्यान वेगवान गोलंदाज डॅनियल सॅम्सच्या गोलंदाजीवर मारला होता. त्याने देखील डॅनियल सॅम्सच्या गतीचा वापर करत पुढे येऊन चेंडू फ्लीक केला होता. परंतु फरक इतकाच होता की, विराट कोहलीला त्या शॉटवर षटकार नव्हे तर चौकार मारण्यात यश आले होते.
मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात, मुंबई इंडियन्स संघाने प्रथम फलंदाजी करताना १५५ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना, कोलकाता नाईट रायडर्स संघाने अवघ्या १५.१ षटकात हे आव्हान गाठले आणि ७ गडी राखून हा सामना आपल्या नावावर केला.
महत्त्वाच्या बातम्या-
केकेआरच्या भात्यातील ‘घातक अस्त्र’ अय्यरची प्लेइंग इलेव्हनमध्ये निवड होण्यामागची कहाणी
‘शांत’ कृष्णाचा ‘तापट’ पोलार्डशी पंगा, भर मैदानातील खडाजंगीचा व्हिडिओ होतोय व्हायरल
मुंबईचा ‘कारभारी’ केकेआरविरुद्ध ठरला लय भारी! चौकारांचा ‘हा’ विक्रम करणारा बनला पहिलाच फलंदाज






