---Advertisement---

शानदार शुभमन…! स्टार्कच्या चेंडूला भिरकावले मैदानाबाहेर, पाहा व्हिडिओ

On: मंगळवार, जानेवारी 19, 2021 10:11 PM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान ब्रिस्बेन येथे सुरू असलेल्या बॉर्डर-गावसकर मालिकेतील शेवटच्या सामन्यात दोन्ही संघांमध्ये उत्तम संघर्ष बघायला मिळत आहे. सामन्याच्या पाचव्या दिवशी 328 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा सलामीवीर शुभमन गिलने 91 धावांची शानदार खेळी केली. आपल्या या खेळीदरम्यानच शुभमनने स्टार्क विरुद्ध एक खणखणीत षटकार देखील ठोकला होता.

भारताच्या डावातील 46 वे षटक टाकण्यासाठी मिचेल स्टार्क गोलंदाजीसाठी आला होता. गिलला बाद करण्यासाठी ऑस्ट्रेलियाने मागील काही षटकांपासून बाउन्सर चेंडूचा वापर करण्यास सुरुवात केली होती. स्टार्कने देखील आपल्या षटकातील दुसरा चेंडू बाउंसर टाकला असता गिलने पुल शॉट खेळत चेंडू सीमारेषेच्या बाहेर फटकावला. गिलच्या या षटकारानंतर मैदानातील सर्व क्रिकेट रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला होता.

शुभमनने सामन्याच्या पाचव्या दिवशी आपल्या फलंदाजीने सर्व क्रिकेट रसिकांची मने जिंकली आहेत. गिलने 140 चेंडूत 8 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने 91 धावांची आक्रमक खेळी केली. गिलच्या या आक्रमक खेळीमुळे भारताला विशाल काय लक्ष्याचा पाठलाग करण्यात मदत झाली. शुबमननंतर रिषभ पंतने ८९ धावांची खेळी करत भारताचा विजय सुनिश्चित केला.

महत्वाच्या बातम्या:

ब्रेकिंग! इंग्लंड विरुद्ध चेन्नईत होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा; विराटसह या खेळाडूंचे पुनरागमन

केव्हिन पीटरसनचे चक्क हिंदीत ट्विट, या कारणासाठी दिला भारताला सावधगिरीचा इशारा  

व्हिडिओ : क्षणाक्षणाला वाढणारी उत्कंठा ते विजयानंतरचा जल्लोष, ऑस्ट्रेलियन कॅमेरामनने टिपलेले खास क्षण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---