---Advertisement---

शुबमन गिल प्रभावहीन? टीम इंडियाला हवा हार्दिकसारखा ऑलराउंडर

On: बुधवार, जून 25, 2025 9:36 AM
---Advertisement---

IND vs ENG: भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिल्या म्हणजेच लीड्स कसोटीमध्ये भारताला इंग्लंडकडून झालेल्या लाजीरवाण्या पराभवानंतर भारताचे माजी प्रशिक्षक रवि शास्त्री आणि इंग्लंडचे माजी कर्णधार नासिर हुसैन यांनी थेटपणे शुबमन गिलच्या कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

सामन्यानंतर बोलताना नासिर हुसैन म्हणाले, “शुबमन गिलमध्ये विराट कोहली किंवा रोहित शर्मासारखा मैदानावरचा प्रभाव दिसला नाही. त्याची कप्तानी अशी वाटली जणू संपूर्ण कमिटी मैदानात निर्णय घेत होती. पहिल्या कसोटीत तो अधिक ‘प्रतिक्रियाशील’ वाटला.”

हुसैन आणि शास्त्री यांचं म्हणणं आहे की पाचव्या दिवशी जडेजाकडून रफमध्ये गोलंदाजी करून इंग्लंडच्या फलंदाजांना जखडून ठेवण्याची संधी होती. मात्र, गिलसह कोणत्याही वरिष्ठ खेळाडूने जडेजाकडे जाऊन रणनीती बदलण्याचा सल्ला दिला नाही, ही मोठी चूक ठरली.

नासिर यांनी स्पष्ट केलं की इंग्लंडसारख्या अटीतटीच्या ठिकाणी भारताला एक सीम-बॉलिंग ऑलराउंडर हवा, जसा पूर्वी हार्दिक पांड्या होता. त्याच्या जागी नितीश रेड्डी किंवा शार्दुल ठाकूर उतरवणं अपुरं ठरलं. खालची फळी सपशेल फ्लाॅप ठरली. (41 धावांत 7 आणि 30 धावांत 6 विकेट्स) ही एक चिंतेची बाब असल्याचं त्यांनी सांगितलं.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात टीम इंडिया 471 धावा करून सर्वबाद झाली. प्रत्युत्तरादाखल, इंग्लंडनेही पहिल्या डावात ऑली पोपच्या शतकाच्या जोरावर 465 धावा केल्या. पहिल्या डावाच्या जोरावर भारताला फक्त 6 धावांची आघाडी मिळाली. त्यानंतर, दुसऱ्या डावात, भारतीय संघाने 364 धावा केल्या आणि इंग्लंडसमोर 371 धावांचे लक्ष्य ठेवले. यजमान संघाने 82 षटकांत 5 गडी गमावून हे लक्ष्य गाठले. इंग्लंडकडून दुसऱ्या डावात बेन डकेटने 149 धावांची शानदार खेळी खेळली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---