---Advertisement---

भविष्यात कोहलीच्या कसोटी निवृत्तीनंतर त्याची जागा कोण घेणार? ‘या’ खेळाडूंमध्ये आहे धमक

On: बुधवार, जुलै 17, 2024 2:52 PM
---Advertisement---

यंदाचा टी20 विश्वचषक भारतानं जिंकल्यानंतर दिग्गज फलंदाज विराट कोहलीनं (Virat Kohli) टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. मात्र, कोहली एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेट खेळत राहणार आहे. लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये महान फलंदाजांची नावं घेतली तर त्यात कोहलीही आहे. कोहली गेल्या 16 वर्षांपासून भारतासाठी क्रिकेट खेळत आहे. अशा परिस्थितीत हा दिग्गज फलंदाज भविष्यात कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेईल, तेव्हा त्याची जागा कोण घेणार? हा मोठा प्रश्न आहे.

या बातमीद्वारे आपण भारताच्या अशा 2 खेळाडूंची नावे पाहूया जे विराटनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्याची जागा घेऊ शकतात.

विराट कोहली (Virat Kohli) हा कसोटी क्रिकेटमध्ये जगातील महान फलंदाजांपैकी एक आहे. या फॉरमॅटमध्ये त्याच्या नावावर 8,848 धावा आहेत. ज्या त्यानं 113 सामन्यांच्या 191 डावांमध्ये केल्या आहेत. एवढंच नाही तर कोहलीनं कसोटीत 29 शतकं झळकावली आहेत. तर त्यानं या फॉरमॅटमध्ये 7 वेळा द्विशतकाचा चमत्कारही दाखवला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत तो चौथ्या क्रमांकावर आहे. यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 254 राहिली आहे.

श्रेयस अय्यर- श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) हा मधल्या फळीतील उत्कृष्ट फलंदाज आहे. परंतू त्याची कसोटी कारकीर्द फार मोठी नाही. आतापर्यंत त्यानं 14 कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्यानं 24 डावात 811 धावा ठोकल्या आहेत. यामध्ये 1 शतक आणि 5 अर्धशतकांचा समावेश आहे. अय्यरची फलंदाजी शैली थोडीफार कोहलीसारखीच आहे. डाव कसा सांभाळायचा हे त्याला माहीत आहे. अशा स्थितीत विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीनंतर अय्यर त्याच्या जागी फिट होऊ शकतो.

शुबमन गिल- भारताचा युवा स्टार फलंदाज शुभमन गिलनं (Shubman Gill) तिन्ही फॉरमॅटमध्ये पदार्पण केलं आहे. त्यानं सलामीला फलंदाजी करुन भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. मात्र, नंतर त्याला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्यात आले. गिलची फलंदाजी शैली पाहून तो कोहलीच्या कसोटी निवृत्तीनंतर भारतासाठी चांगला पर्याय ठरु शकतो. गिलला कसोटी क्रिकेटचा अनुभव आहे. त्यानं 25 सामन्यांच्या 46 डावात 1,492 धावा केल्या आहेत. त्यामध्ये 4 शतकं आणि 6 अर्धशतकांचा समावेश आहे.

विराट कोहलीनंतर शुबमन गिलकडे भारतीय क्रिकेटचं भविष्य म्हणून बघितलं जात आहे. गिल सध्या भारतासाठी तिन्ही फाॅरमॅटमध्ये चांगली फलंदाजी करत आहे. पण यंदाच्या टी20 विश्वचषकात त्याचा समावेश करण्यात आला नव्हता. श्रेयस अय्यर बद्दल बोलायचं झालं तर तो कसोटी क्रिकेटमध्ये मधल्या फळीत भारतासाठी चांगला पर्याय ठरु शकतो.

महत्त्वाच्या बातम्या-

कर हर मैदान फतेह! आशिया चषक जिंकण्यासाठी सज्ज आहे भारतीय संघ, ‘या’ दिवशी पाकिस्तानशी भिडणार
अर्शदीप सिंगला ऑस्ट्रेलियात कसोटी पदार्पणाची संधी! फक्त करावं लागेल हे काम
रिकी पाँटिंगच्या वक्तव्याने क्रिकेट विश्वात खळबळ! म्हणाले.., हा युवा खेळाडू होणार जागतिक क्रिकेटचा पुढचा सुपरस्टार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---