भारतीय देशांतर्गत स्पर्धा, दुलीप ट्रॉफी 2024 पाच सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या देशांतर्गत स्पर्धेत टीम इंडियाचे अनेक स्टार खेळाडू खेळताना दिसणार आहेत. यामध्ये रिषभ पंत, इशान किशन, शुभमन गिल यांच्यासह अनेक स्टार खेळाडूंचा समावेश आहे. दरम्यान, स्पर्धेपूर्वी भारताचा युवा सलामीवीर शुभमन गिलचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो नेटमध्ये घाम गाळताना दिसत होता.
शुभमन गिलने नेटमध्ये दमदार फलंदाजी केली
खरे तर, भारतीय संघ या महिन्यात मायदेशात बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिका खेळताना दिसणार आहे. 19 सप्टेंबरपासून या मालिकेची सुरुवात होणार आहे. त्यानंतर भारतीय संघाला बांगलादेशविरुद्ध टी20 मालिकाही खेळायची आहे. या मालिकेपूर्वी शुभमन गिल नेटमध्ये कसून सराव करत आहे. गिल मोहालीच्या आयएस बिंद्रा पीसीए स्टेडियममध्ये सराव करताना दिसला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यावेळी गिल कसोटीची जर्सी घालून फलंदाजी करताना दिसत आहे.
श्रीलंकेविरुद्ध खराब फॉर्ममध्ये होता गिल
जुलै महिन्यांत खेळल्या गेलेल्या मालिकेत शुभमन गिलला श्रीलंकेविरुद्ध चांगली कामगिरी करता आली नाही. त्याने टी20 सामन्यात 34 आणि 39 धावांची खेळी खेळली होती. त्याचप्रमाणे वनडे सामन्यातही गिलची बॅट शांत दिसली होती. त्याने पहिल्या वनडे सामन्यात 16 धावा, दुसऱ्या वनडे सामन्यात 35 धावा आणि तिसऱ्या वनडे सामन्यात फक्त 6 धावा केल्या होत्या.
— Khushpreet Singh Aulakh (@kp_khushpreet) September 1, 2024
भारतीय संघातील अनेक स्टार्स दुलीप ट्रॉफीमध्ये खेळणार आहेत
दुलीप करंडक स्पर्धेत शुभमन गिलसह अनेक खेळाडू खेळणार आहेत. शुभमनला या स्पर्धेसाठी अ संघाचा कर्णधार बनवण्यात आले असून या संघात यशस्वी जयस्वाल, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज या खेळाडूंचा समावेश असेल. सिराज आणि जडेजा टीम-बीचे नेतृत्व करतील, ज्यात रिषभ पंत आणि वॉशिंग्टन सुंदर यांचा समावेश आहे. या स्पर्धेद्वारे भारतीय खेळाडू बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी लयीत येण्याचा सरावही करतील.
हेही वाचा-
बांगलादेशच्या यष्टीरक्षकाचा पाकिस्तानात धोनीसारखा पराक्रम, ‘या’ खास यादीत मिळवले स्थान
‘अर्जुन तेंडुलकरची कारकीर्द उद्ध्वत करू नका’; योगराज सिंग यांच्यावर संतापले चाहते
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे टाॅप-5 वेगवान गोलंदाज, एकही भारतीय नाही