भारत विरुद्ध पाकिस्तान संघ आशिया चषक 2023 स्पर्धेतील आपला दुसरा सामना रविवारी (दि. 10 सप्टेंबर) खेळणार आहेत. हा सामना कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडिअम येथे खेळला जाणार आहे. या सामन्याच्या एक दिवस आधी भारतीय संघाचा युवा स्टार खेळाडू शुबमन गिल याने माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शुबमन गिलने बाबर आझमचे कौतुक केले. पाकिस्तान कर्णधार बाबर आझम याच्याविषयी बोलताना गिलने मनमोकळेपणाने भाष्य केले. आता गिलच्या वक्तव्याची क्रिकेटविश्वात चर्चा रंगली आहे.
काय म्हणाला गिल?
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) याच्याविषयी बोलतााना शुबमन गिल (Shubman Gill) म्हणाला की, “जर कोणत्याही संघातील कोणताही खेळाडू चांगली कामगिरी करत असेल, त्यावेळी प्रत्येकजण त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमागील कारण काय आहे, हे पाहतो. त्यांची खासियत काय आहे, हे जाणून घेतो. आम्हीही या गोष्टी पाहतो आणि नक्कीच, बाबर आझम हा जागतिक दर्जाचा खेळाडू आहे. आम्ही त्याला पाहतो आणि त्याचे कौतुकही करतो.”
पुढे बोलताना गिलने पाकिस्तानी वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी आणि नसीम शाह यांच्या अनोख्या कौशल्याची माहिती दिली. तसेच, त्यांच्या विशिष्ट क्षमतेवर आणि विरोधी संघांच्या फलंदाजांसमोरील आव्हानांवरही भाष्य केले.
Shubman Gill said "Babar Azam is a world class player, we watch & admire him". [Press] pic.twitter.com/VuXyZGlTLe
— Johns. (@CricCrazyJohns) September 9, 2023
गिल असेही म्हणाला की, “ते वेगळ्या प्रकारचे गोलंदाज आहेत. प्रत्येक गोलंदाजाचे स्वत:चे असे कौशल्य असते. मला वाटते, त्या दोघांमध्ये वेगवेगळे कौशल्य आहे. शाहीन, जसे आपण पाहिले आहे की, तो अनेकदा चेंडू स्विंग करतो. नसीम वेगाचा वापर करतो आणि जर त्याला खेळपट्टीची मदत मिळत असेल, तर तो त्यानुसार क्षेत्र निश्चित करतो. दोघेही वेगवेगळ्या प्रकारचे गोलंदाज आहेत, जे वेगवेगळ्या परिस्थितीत विरोधी फलंदाजांसमोर आव्हान उभे करतात.”
शनिवारी (दि. 02 सप्टेंबर) आशिया चषक 2023 स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पावसामुळे रद्द झाला होता. यावेळी फक्त भारताला पूर्ण डाव फलंदाजी करता आली होती. यावेळी भारतीय संघ 48.5 षटकात सर्व विकेट्स गमावत 266 धावा करू शकला होता. यामध्ये शुबमन गिल 32 चेंडू खेळून फक्त 10 धावाच करू शकला होता. यामध्ये फक्त 1 चौकाराचा समावेश होता. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हॅरिस रौफ याने गिलला त्रिफळाचीत बाद केले होते. अशात सुपर-4 सामन्यात भारत-पाकिस्तान संघ रविवारी (दि. 10 सप्टेंबर) आमने-सामने असणार आहेत. अशात या सामन्यात गिल पाकिस्तान गोलंदाजांचा कसा सामना करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (Shubman Gill praises babar azam said this about him read here)
हेही वाचाच-
पुन्हा झाली भविष्यवाणी! भारत नाही, तर ‘या’ दोन संघांमध्ये खेळली जाईल World Cup Final, वाचा
SL vs BAN Toss: सुपर फोरमधील दुसऱ्या सामन्यात ‘हा’ संघ ‘टॉस का बॉस’, एक बदलासह बांगलादेश उतरणार मैदानात