---Advertisement---

IND vs ENG: इंग्लंड मालिकेपूर्वी कर्णधार शुबमन गिलचा मास्टरप्लॅन! म्हणाला…

On: रविवार, जून 15, 2025 10:05 PM
---Advertisement---

Shubman Gill Statement: भारत आणि इंग्लंड दोन्ही संघात 5 सामन्यांची कसोटी मालिका 20 जूनपासून सुरू होईल. यावेळी भारतीय संघाची धुरा शुबमन गिलच्या हाती आहे. (Shubman Gill India’s New Test Captain) मालिकेच्या सुरुवातीपूर्वी गिलने कर्णधार म्हणून आपल्या भविष्यातील योजनाबद्दल सांगितले आहे. त्याने सांगितले आहे की, कर्णधार म्हणून त्याला संघात असे वातावरण निर्माण करायचे आहे, जिथे प्रत्येक खेळाडू सुरक्षित आणि आनंदी राहील.

गिलसाठी कर्णधार म्हणून हा दौरा सोपा नसेल. गिलवर खूप दबाव असेल. भारतीय संघ सध्या बदलाच्या टप्प्यात आहे. या संघात गेल्या अनेक वर्षांपासून रोहित शर्मा, विराट कोहली आणि रविचंद्रन अश्विनसारखे खेळाडू होते. पण आता ते कसोटी संघाचा भाग नाहीत. अशा परिस्थितीत संघाला एकत्र ठेवणे, गिलसाठी मोठी जबाबदारी ठरेल. संघात चांगले वातावरण टिकवून ठेवण्याची जबाबदारीही कर्णधार गिलची असेल. (Shubman Gill captaincy roadmap)

गिलने एका मुलाखतीदरम्यान सांगितले, “मी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार होईन असे स्वप्नातही कधी पाहिले नव्हते. मला फक्त देशासाठी खेळायचे होते. देशासाठी चांगली कामगिरी करून सामने जिंकायचे होते.” (Shubman Gill Test captain)

गिलचे कर्णधार म्हणून ध्येय आहे की, तो एक चांगली संघ संस्कृती निर्माण करेल. तो म्हणाला, “ट्रॉफी जिंकण्याव्यतिरिक्त मला अशी संघ संस्कृती निर्माण करायची आहे जिथे प्रत्येकजण खूप सुरक्षित आणि आनंदी असेल. असे वातावरण निर्माण करणे कठीण असू शकते, कारण आम्ही खूप सामने खेळतो, वेगवेगळ्या स्क्वाडमध्ये असतो. पण जर मी हे करू शकलो तर मी नक्कीच करेन, हे माझे ध्येय आहे.” (Shubman Gill Statement On Team)

भारतीय संघाच्या इंग्लंड दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक: (India vs England Full Test Series schedule)

  • या मालिकेतील पहिला सामना 20 जूनपासून हेडिंग्ले येथे खेळवला जाईल.
  • तर दुसऱ्या कसोटीची सुरुवात 2 जुलैपासूबर्मिंगहॅममध्ये होईल.
  • तिसरा सामना 10 जुलैपासून लॉर्ड्सवर खेळला जाईल.
  • मालिकेतील चौथा सामना 23 जुलैपासून मँचेस्टरमध्ये खेळवला जाईल.
  • तर मालिकेतील शेवटचा सामना 31 जुलैपासून लंडनच्या ओव्हलवर होईल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---