भारतीय संघाने शनिवारी (दि. 21 जानेवारी) दुसऱ्या वनडे सामन्यात न्यूझीलंडच्या नाकी नऊ आणल्या. भारतीय गोलंदाजांनी आणि फलंदाजांनी दमदार कामगिरी करत संघाला विजयी बनवले. भारताने या सामन्यात 8 विकेट्स राखून विजय नोंदवला. यासह भारताने मालिकेत 2-0ने विजयी आघाडी घेतली. धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी दमदार भागीदारी रचली. 2023खेळल्या गेलेल्या वनडे सामन्यांमध्ये रोहित आणि गिल हीच जोडी सलामीला उतरली आहे. आता न्यूझीलंडविरुद्ध भागीदारी करत त्यांनी भारताचा विजय सोपा केला.
भारतीय संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी न्यूझीलंडने 34.3 षटकात 10 विकेट्स गमावत 108 धावा चोपल्या होत्या. हे आव्हान पार करताना भारताकडून रोहित शर्मा आणि शुबमन गिल (Rohit Sharma And Shubman Gill) यांनी डावाची सुरुवात केली. यावेळी रोहित आणि गिलने पहिल्या विकेटसाठी 72 धावांची भागीदारी रचली. यामध्ये रोहितच्या 51 आणि गिलच्या 20 धावांचे योगदान होते. रोहित या सामन्यात 51 धावा करून बाद झाला, तर गिल शेवटपर्यंत मैदानात टिकून राहिला. त्याने या सामन्यात नाबाद 40 धावांचे योगदान दिले.
सन 2023मध्ये वनडेत रोहित-गिल जोडीच्या भागीदाऱ्या
विशेष म्हणजे, 2023मध्ये वनडेत रोहित-गिल जोडीने पाच वेळा डावाची सुरुवात केली आहे. यातील पहिल्या तीन सामन्यात ही जोडी श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत मैदानावर उतरली होती. यावेळी श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात रोहित आणि गिल जोडीने पहिल्या विकेटसाठी तब्बल 143 धावांची भागीदारी रचली होती. त्यानंतर दुसऱ्या वनडेत या जोडीला खास कमाल करता आली नव्हती. त्यांना पहिल्या विकेटसाठी फक्त 33 धावांचे योगदान देता आले होते. त्यानंतर तिसऱ्या वनडेत ही जोडी पुन्हा फॉर्ममध्ये आली होती. त्यांनी तिसऱ्या वनडेत पहिल्या विकेटसाठी 95 धावांची भागीदारी रचली होती.
त्यानंतर 18 जानेवारीपासून सुरू झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात रोहित आणि गिल जोडीने पहिल्या विकेटसाठी 60 धावांची भागीदारी रचली होती. त्यानंतर आता दुसऱ्या वनडेत या जोडीने 72 धावा कुटल्या. अशाप्रकारे आतापर्यंत 2023मध्ये खेळल्या गेलेल्या 5 वनडे सामन्यांमध्ये या जोडीने सलामीला फलंदाजी करताना 403 धावांचे योगदान दिले आहे. तसेच, त्यात संघाला विजयदेखील मिळवून दिला आहे. (Shubman Gill-Rohit Sharma partnerships in ODIs in 2023)
सन 2023मध्ये वनडेतील रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांची भागीदारी
72 धावा, विरुद्ध- न्यूझीलंड*
60 धावा, विरुद्ध- न्यूझीलंड
95 धावा, विरुद्ध- श्रीलंका
33 धावा, विरुद्ध- श्रीलंका
143 धावा, विरुद्ध- श्रीलंका
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दुसऱ्या वनडेत भारताच्या गोलंदाज अन् फलंदाजांची हवा! न्यूझीलंडला धूळ चारत मालिका घातली खिशात
ऍलेक्स हेल्सचे इंटरनॅशनल लीग टी20तील पहिले शतक, पाहा इतर स्पर्धेतील शतकवीरांची यादी; गेलचा दोनदा समावेश