न्यूझीलंड संघ जानेवारी महिन्यात भारत दौऱ्यावर आला होता. या दौऱ्यात न्यूझीलंडने भारताविरुद्ध 3 सामन्यांची वनडे आणि टी20 मालिका खेळली. यातील वनडे मालिकेत भारताने न्यूझीलंडला क्लीन स्वीप केले. त्यानंतर टी20 मालिकेत 2-1ने पराभवाचा धक्का दिला. या दौऱ्यातील शेवटचा टी20 सामना बुधवारी (1 फेब्रुवारी) अहमदाबाद येथे पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने 168 धावांनी सर्वात मोठा टी20 विजय संपादन केला. या सामन्यात गिलने नाबाद शतक झळकावत भारताच्या विजयात मोठे योगदान दिले. त्यानंतर बोलताना त्याने आपल्या यशाचे श्रेय वडिलांना दिले.
शुबमन याच्यासाठी न्यूझीलंड विरुद्धच्या दोन्ही मालिका स्वप्नवत ठरल्या. वनडे मालिकेत शुबमन गिल याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 3 सामने खेळताना 180 च्या सरासरीने 360 धावा केल्या. यात एक शतक व एका द्विशतकाचा समावेश होता. टी20 मालिकेतही भारताकडून सर्वाधिक धावा करण्याचा मान गिलनेच पटकावला. गिलने यावेळी 3 सामन्यात 72च्या सरासरीने 144 धावा केल्या.
अहमदाबाद येथील सामन्यात सलामीला उतरल्यानंतर त्याने अखेरपर्यंत नाबाद राहत 63 चेंडूवर 126 धावा कुटल्या. यामध्ये 12 चौकार व 7 षटकारांचा समावेश होता. या सामन्यात त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. पुरस्कारानंतर पारितोषिक वितरण समारंभात बोलताना तो म्हणाला,
“माझ्या या यशाचे श्रेय माझ्या वडिलांना, संघ व्यवस्थापनाला व कर्णधारांना जाते. 90 टक्के यशाचे श्रेय हे माझ्या वडिलांचे आहे. कारण हे स्वप्न त्यांनीच पाहिले होते.”
शुबमन गिल याचे वडील हे शेतकरी होते. मात्र, शुबमन हा वयोगट क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करू लागल्यानंतर त्याच्या वडिलांनी आपले बस्तान मोहाली येथे बसविले. त्यानंतर शुबमनने अधिक मेहनत करत भारतीय संघापर्यंत मजल मारली आहे.
(Shubman Gill Said His Sucess Credit Goes To Father Team Management And Captain)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आता डोळ्यांना ताण देण्याची गरज नाही! बीसीसीआयने जिओला दिली मंजुरी, 4K व्हिडिओत दिसणार आयपीएल सामने
ऑस्ट्रेलियासाठी धोक्याची घंटी! कसोटी मालिकेपूर्वी फिटनेस टेस्टमध्ये पास झाला पठ्ठ्या