गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियाचा युवा फलंदाज शुबमन गिल आणि मास्ट ब्लास्टर सचिन तेंडूलकर याची मुलगी सारा तेंडूलकर यांच्या रिलेशनशीपबाबत चर्चा सुरू होत्या. आता शेवटी या चर्चांना पूर्णविराम लागल्याचे चिन्ह दिसत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे दोघांनीही आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एकमेकांना अनफॉलो केलं असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे त्यांच्या नात्यात दूरावा निर्माण झाला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या बातम्यांनुसार सारा आणि शुबमन एकमेकांच्या जवळ असल्याच्या चर्चा होत्या. याचे प्रमुख कारण म्हणजे दोघेही सोशल मीडियावर एकमेकांच्या फोटोवर आवर्जून लाईक आणि कमेंट्स करत होते. त्यामुळे आता दोघांनी एकमेकांना अनफॉलो केल्यामुळे दोघांमध्ये दुरावा निर्माण जला असल्याचे बोलले जात आहे. मात्र, ते दोघे रिलेशनशीप मध्ये होते की नाही याबाबत अद्याप कोमतीही ठोस बातमी समोर आलेली नव्हती.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
भारतावर विजय मिळवण्यासाठी पाकिस्तानी फलंदाजाचे देवाला साकडे! ‘तो’ फोटो होतोय व्हायरल
भारतीय फलंदाजांना घाबरले पाकिस्तान! एक गोलंदाजी प्रशिक्षक असतानाही दुसऱ्याची केलीय नियुक्ती