येत्या १८ जून ते २२ जून दरम्यान भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघ मैदानात कसून सराव करताना दिसून येत आहे. न्यूझीलंड संघाने देखील इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत १-० ने विजय मिळवला आहे. त्यामुळे आगामी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दोन्ही संघामध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळणार आहे. या मोठ्या सामन्यात शुबमन गिल सलामी फलंदाजी करण्यासाठी प्रबळ दावेदार आहे. परंतु या सामन्यात सलामीला गेल्यावर तो स्ट्राइक घेणार नाहीये. यामागचे कारण देखील त्याने सांगितले आहे.
युवा शुबमन गिलला ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. या मालिकेत त्याने उत्कृष्ट फलंदाजी केली होती.ज्यामुळे त्याला इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत स्थान देण्यात आले होते. विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत तो रोहित शर्मा सोबत सलामी फलंदाजी करू शकतो.
गिलने द ग्रेड क्रिकेटर यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की,” मला आठवण आहे की, मी माझ्या पदार्पणाच्या सामन्यात मयंक अगरवालसोबत डावाची सुरुवात केली होती. मी त्याला म्हटले होते की, तू डावाची सुरुवात कर, मी नॉन – स्ट्राइकला राहील. त्यानी या गोष्टीसाठी होकार दिला होता. त्याला माहीत होते की, मी दबावात आहे. त्याने दोन्ही डावात पहिला चेंडू खेळला होता. ”
तसेच तो पुढे म्हणाला की,” पुढच्या सामन्यात मला डावाची सुरुवात करायची होती. मयंक या सामन्यात खेळत नव्हता. त्याच्याऐवजी रोहित शर्मा खेळला होता. त्यांनी स्वतः येऊन म्हटले होते की, तू युवा आहेस, त्यामुळे मी स्ट्राइक घेतो. त्यानंतर त्यांनी सर्व सामन्यात स्ट्राइक घेतली होती.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात, मला नाही माहित, मी त्याला( रोहितला ) का म्हटले की, मी स्ट्राइक घेणार आहे, असे करणे माझ्यासाठी तोट्याचे ठरले. मी तिसऱ्या की चौथ्या चेंडूवर ० धावेवर बाद झालो होतो. आता भविष्यात असे होणार नाही. आता मी कधीच स्ट्राईक घेणार नाही.”
महत्त्वाच्या बातम्या –
राज की बात!! डाव्या हाताच्या फलंदाजांना बाद करण्यासाठी आर अश्विन करतो ‘या’ रननीतीचा अवलंब
विक्रमी सामन्यात अँडरसन बनला सर्वात दुर्दैवी आकडेवारीचा भाग; ‘हा’ नकोसा विक्रम झाला नावावर
डीकॉकच्या शतकानंतर रबाडाची धारदार गोलंदाजी; दक्षिण आफ्रिकेचा वेस्ट इंडिजविरुद्ध एका डावाने विजय