शुबमन गिल हा भारतीय संघाचा उदयोन्मुख खेळाडू आहे. या युवा फलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटविला आहे. अनेक क्रिकेट पंडितांद्वारे गिलला भविष्यातील स्टार म्हटले जाते. कर्णधार विराट कोहली देखील गिलचा मोठा प्रशंसक आहे. तथापि, जेव्हा गिलला विराटला कोणती एक गोष्ट शिकवू शकतो, असे विचारले असता त्याने एक मजेदार उत्तर दिले आहे.
ईएसपीएन क्रिकइन्फोवरील कार्यक्रमात गिलला काही प्रश्नांची उत्तरे द्यायची होती. त्यातील एका प्रश्नावर गिल म्हणाला “मी विराट कोहलीला फिफा शिकवू इच्छितो.” गिल म्हणाला की विराट नेहमीच या व्हिडिओ गेममध्ये माझ्याकडून हरतो. त्यामुळे मी त्याला फिफा शिकवू इच्छितो.
तसेच भारताचा हा स्टार खेळाडू म्हणाला की भूतकाळातील कोणाता सामना त्याला खेळायचा असेल, तर त्याने 2011 च्या विश्वचषकातील अंतिम सामन्याचे नाव घेतले. 2011 च्या विश्वचषकातील अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा पराभव करत 28 वर्षांनंतर विश्वचषकावर आपले नाव कोरले होते. याशिवाय गिलने दुसर्या एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले की, त्याला टी20 विश्वचषकात विजय मिळवून तो आपल्या वडिलांना भेट म्हणून द्यायचा आहे.
गिल आगामी काळात भारताच्या कसोटी संघासोबत इंग्लंडचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात 18 जून पासून कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे. त्यानंतर ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये इंग्लंड विरुद्ध 5 कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. या संपूर्ण दौऱ्यात गिलकडून सर्वच क्रिकेट प्रेमींना उत्तम कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
भारताच्या इंग्लंड दौऱ्याचे वेळापत्रक खालील प्रमाणे असेल
18 ते 22 जून – कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना (भारत विरुद्ध न्यूझीलंड), साऊथँम्पटन
कसोटी मालिका – इंग्लंड विरुद्ध भारत
4-8 ऑगस्ट – पहिला कसोटी सामना, नॉटिंगघम
12-16 ऑगस्ट – दुसरा कसोटी सामना, लॉर्ड्स
25-29 ऑगस्ट – तिसरा कसोटी सामना, हेडिंग्ले
2-6 सप्टेंबर – चौथा कसोटी सामना, लंडन
10-14 सप्टेंबर – पाचवा कसोटी सामना, मँटेस्टर
महत्त्वाच्या बातम्या –
कुलदीपला येतेय एमएस धोनीची आठवण, म्हणाला, “माही भाईच्या मार्गदर्शनची कमी जाणवते, कारण…”
आम्ही चालवू पुढे वारसा! नबीच्या मुलाने ठेवले वडिलांच्या पावलावर पाऊल, केली षटकारांची आतिषबाजी
झहीर-युवराजसोबत केली कारकीर्दीची सुरुवात, मात्र ‘त्याला’ एका वर्षात जावे लागले संघाबाहेर