भारत आणि न्यूझीलंड यायंच्यातील तिसरा वनडे सामना इंदोरच्या होळकर स्टेडियमवर खेळला गेला. रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी या सामन्यात देखील संघाला वेगवान सुरुवात देत धावसंख्या उंचावली. सामन्यात रोहित शर्मा पाठोपाठ शुबमन गिल यानेही शतक ठोकले आणि संघाला वेगवान सुरुवात करून दिली. गिलने अवघ्या 72 चेंडूत शतक पूर्ण केले. यात 13 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता.
CENTURY number 4️⃣ in ODI cricket for @ShubmanGill!
The #TeamIndia opener is in supreme form with the bat 👌👌
Follow the match ▶️ https://t.co/ojTz5RqWZf…#INDvNZ | @mastercardindia pic.twitter.com/OhUp42xhIH
— BCCI (@BCCI) January 24, 2023
शुबमन गिल (Shubman Gill) याच्या शतकापूर्वी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने स्वतःचे शतक पूर्ण केले. रोहितने 85 चेंडूत 101 धावा करून विकेट गमावली. तर शुबमन गिल 103 धावा करून बाद झाला. या दोघांमध्ये द्विशतकी भागीदारी झाली. पहिल्या विकेटसाठी रोहित आणि शुबमनमध्ये 157 चेंडूत 212 धावांची भागीदारी झाली. रोहित शर्मा अष्टपैलू मायकल ब्रेसवेल याच्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला. तर शुबमन गिल ब्लेअर टिकणार (Blair Tickner) याच्या चेंडूवर डेवॉन कॉनवे याच्या हातात झेलबाद झाला. रोहित आणि गिलने दिलेल्या वेगवान सुरुवातीमुळे संघाने 241.1 षटकात 200 धावांचा टप्पा पार केला. (Shubman Gill scored a century in the third ODI against New Zealand)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
स्म्रीती मंधाना ऑन फायर! विंडीजविरुद्ध झंझावाती फिफ्टी ठोकत रचला विक्रम, बनली जगातली तिसरी ओपनर
तिसऱ्या वनडेसाठी मैदानात उतरताच रोहित-विराटचा खास विक्रम, अझरुद्दीन अन् गांगुलीलाही पछाडले