भारतीय क्रिकेट संघाचा युवा सलामीवीर शुबमन गिल हा शानदार लयीत परतला आहे. त्याने विश्वचषक 2023 स्पर्धेच्या 33व्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध विस्फोटक फलंदाजी केली. यावेळी त्याचे शतक अवघ्या 8 धावांनी हुकले. गिलच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर भारताने श्रीलंकेविरुद्ध मोठी धावसंख्या उभारली आणि शेवटी 302 धावांनी दणदणीत मोठा विजय मिळवला. या विजयामुळे भारताने 7 सामने जिंकत 14 गुण मिळवले. तसेच, उपांत्य फेरीतही प्रवेश केला. पॉईंट्स टेबलमध्येही भारत पुन्हा अव्वलस्थानी पोहोचला. अशात या विजयानंतर शुबमन गिलचे विधान चर्चेचा विषय ठरत आहे.
खरं तर, शुबमन गिल (Shubman Gill) आपला पहिलाच वनडे विश्वचषक खेळत आहे. त्यात या युवा सलामीवीराला विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेतील सुरुवातीचे दोन सामने खेळता आले नव्हते. त्याने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातून मैदानात पुनरागमन केले. त्यानंतर त्याने आतापर्यंत 5 डावात फलंदाजी करताना 2 अर्धशतकांच्या मदतीने 196 धावा केल्या आहेत.
काय म्हणाला शुबमन?
श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर त्याने तब्येतीविषयी खुलासा केला. यावेळी त्याने सांगितले की, तो पूर्णपणे फिट नाहीये. आजारपणामुळे त्याला वजन गमवावे लागले. गिलने तब्येतीवषयी मोठे विधान करत म्हटले की, “मी पूर्णपणे फिट नाहीये. डेंग्यूमुळे माझे 4 किलो वजन कमी झाले आहे.” खरं तर, डेंग्यूमुळेच गिलला सुरुवातीचे सामने खेळता आले नव्हते.
श्रीलंकेविरुद्ध दबाव बनवण्यासाठी संयमी फलंदाजी करण्याबाबत पुढे तो म्हणाला की, “काही चेंडू वेगाने येत होते आणि मी त्यांना हिट केले. मी गोलंदाजांवर दबाव बनवण्याचा प्रयत्न करत होतो. मला वाटते की, मागील सामना सोडला, तर मला सर्व सामन्यात सुरुवात मिळाली. आम्ही आज स्ट्राईक रोटेट करण्याचा विचार केला. प्रामाणिकपणे सांगायचं झालं, तर मला वाटले नाही की, ही 400 धावांची खेळपट्टी होती. आम्ही चांगली फलंदाजी करून 350 धावा केल्या.”
भारताने मारली 357 धावांची मजल
शुबमन गिल याने आजारपणातही वानखेडे स्टेडिअम (Wankhede Stadium) येथे 92 चेंडूत 92 धावांची झंझावाती खेळी केली. यामध्ये 2 चौकार आणि 11 चौकारांचा समावेश होता. भारतीय संघाने रोहित शर्माची विकेट अवघ्या 4 धावांवर गमावली होती. त्यानंतर गिल आणि विराट कोहली यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी 189 धावांची भागीदारी झाली. तसेच, श्रेयस अय्यरनेही 82 धावांची खेळी केली. त्यामुळे भारताला 357 धावांपर्यंत मजल मारता आली. (shubman gill shocking statement about health after wins over sri lanka cwc 2023 said this know here)
हेही वाचा-
इकडं राहुलची विकेट पडली अन् तिकडं पत्नी अथियाने तोंड लपवलं; रिऍक्शन कॅमेऱ्यात कैद, तुम्ही पाहिला का?
Video- पत्रकाराने ‘शॉर्ट बॉल’विषयी विचारला प्रश्न, रागाने लाल झाला श्रेयस; म्हणाला, ‘तुम्ही लोकांनीच…’