भारतीय संघाचा युवा कर्णधार शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने झिम्बाब्वे विरुद्धच्या 5 सामन्यांच्या टी20 मालिकेत 1-1 ने बरोबरी केली आहे. तर तिसरा टी20 सामना 10 जुलै रोजी होणार आहे. तर पहिल्या दोन सामन्यात अनुउपल्बध असलेल्या शिवम दुबे, संजू सॅमसन आणि यशस्वी जयस्वाल हे तिघे पुढच्या सामन्यापासून संघात दिसणार आहेत. वास्तविक, विश्वविजेत्या संघा सोबत असलेल्या दुबे, सॅमसन आणि जयस्वाल हे मुंबई मधील विजयी परेडसाठी भारतात परतावे लागले होते.
तिसऱ्या टी20 सामन्यापूर्वी शुबमन गिलची डोकेदुखी वाढली आहे. शिवम दुबे, संजू सॅमसन आणि यशस्वी जयस्वाल उपल्बध झाल्याने संघाची प्लेइंग इलेव्हन निवड करण्यासाठी कर्णधार शुबमन गिलला कस लागणार आहे. मागील सामन्यात 100 धावांनी मोठ्या विजय मिळवल्यानंतर तिसऱ्या टी20 सामन्यात संघ निवडीसाठी गिल समोर अव्हान असणार आहे. अश्या परिस्थितीत गिल विश्वविजेत्या संघातील खेळाडूंना बेंचवर बसवणार का मागील सामन्यातील प्लेइंग इलेव्हन सोबतच पुढे जाणार हे पाहणं गरजेचे राहिल.
संजू सॅमसन आणि यशस्वी जयस्वाल यांना टी20 विश्वचषक 2024 मध्ये एकही सामन्यात संधी मिळाली नव्हती. या कारणामुळे शुबमन गिल आणि कोच व्ही व्ही एस लक्ष्मण वर या दोघांना संघात स्थान देण्याचे दबाव असणार आहे. तर अष्टपैलू शिवम दुबे संघामध्ये समतोल राखू शकतो. यामुळे शिवम संघात घेणे टीम इंडियाच्या फायद्याच ठरु शकते.
दुसऱ्या सामन्यातील भारतीय प्लेइंग इलेव्हनवर नजर टाकली तर ध्रुव जुरेलची जागा संजू सॅमसनला मिळू शकते असे दिसते. तसेच साई सुदर्शनच्या जागी शिवम दुबेचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश केला जाऊ शकतो. मात्र यशस्वी जयस्वालसाठी शुभमनला वरच्या फळीत स्थान मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागणार आहे. कारण टाॅप ऑर्डर मध्ये मागील सामन्यात अभिषेक शर्माने शतक झळकावले होते तर ऋतुराज गयकवाडने 77 धावा केल्या होत्या आणि कर्णधार शुबमन गिल हे तिघे प्लेइंग इलेव्हन स्थान नक्की आहे. अश्या परिस्थितीत कोच व्ही व्ही एस लक्ष्मण आणि कर्णधार शुबमन गिल समोर कठीण अव्हान आहे.
महत्तवाच्या बातम्या-
विराट कोहलीचं स्वप्नातील घर पाहिलं का? उत्कृष्ट इंटीरियर, सुंदर लोकेशन; किती आहे किंमत?
पाऊस कितीही असो, मॅच कधीच थांबणार नाही! येथे बनत आहे जगातील पहिलं अत्याधुनिक क्रिकेट स्टेडियम
टीम इंडियाला मिळाला नवा ‘सिक्सर किंग’, अभिषेक शर्मानं मोडला हिटमॅनचा मोठा विक्रम