भारतीय संघाचा युवा सलामीवीर फलंदाज शुबमन गिलने खूप कमी वयात भारतीय संघात स्वतः साठी स्थान निर्माण केले. ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या वेळेस त्यानी आपल्या कसोटी कारकीर्दीची दमदार सुरुवात केली. परंतु इंग्लंड विरुद्धाच्या मायदेशात झालेल्या कसोटी मालिकेत त्याला चांगेल प्रदर्शन करता आले नाही. पण त्याच्यावरील विश्वास कायम ठेवत निवड समीतीने त्याला इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात संधी दिली आहे.
भारताचा इंग्लंड दौऱ्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना 18 ते 22 जून दरम्यान खेळायचा आहे आणि त्यानंतर भारतीय संघ इंग्लंड विरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. भारतीय संघाने या दौऱ्याची जय्यत तयारी सुरू केली आहे.
या दरम्यान ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज ब्रॅड हॉग यांनी टाइम्स नाऊला दिलेल्या एका मुलाखतीत असे म्हटले आहे की, शुबमन गिल मानसिकदृष्ट्या खूप मजबूत आहे. परंतु त्याच्या फलंदाजीत काही कमजोरी आहेत. त्याच्या कमजोरीवर त्याला काम करावे लागले.
हॉग म्हणाले, ‘गिलमध्ये एक कमजोरी आहे, ज्यावर एक गोलंदाज म्हणून मी वार करेल. शुबमन गिल ला ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू मारण्यास प्रवृत्त केले तर तो एकप्रकारचा अर्धा कट आणि अर्धा बॅकफुट ड्राईव्ह खेळतो. तुम्हाला सातत्याने याच जागेवर गोलंदाजी करावी लागेल. मला त्याची ही एकच कमी दिसते. तरी तो या शॉटवर धावाही बऱ्याच काढतो.’
हॉग यांनी त्याचे कौतुकही केले. ते म्हणाले, ‘मला त्याचे व्यक्तिमत्व खूप आवडते. तो सध्या रोहित शर्मासह फलंदाजी करत आहे. मला या जोडीला तोडायला अवडणार नाही. यावेळी गिलला माहित आहे, त्याला काय करायचे आहे.’
शुबमन गिलच्या खेळला लागले ग्रहण
सध्या शुबमन गिलच्या कामगिरी खराब होत आहे. त्याला इंग्लंड संघाविरुद्ध चांगली कामगिरी करता आली नव्हती. गिलने इंग्लंड विरुद्ध 4 कसोटी सामन्यात 19.83 च्या सरासरीने 119 धावा काढल्या. त्याने फक्त एकच अर्धशतक झळकावले आहे. इंडियन प्रीमियर लीग 2021 मध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून त्याने काही खास कामगिरी केली नाही. त्याने 7 सामन्यात 18.85 च्या सरासरीने 132 धावा काढल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
भल्या- भल्या फलंदाजांच्या दांड्या गुल करणाऱ्या मोहम्मद शमीचे निवृत्तीवर मोठे भाष्य; पाहा काय म्हणतोय
“जे उपलब्ध नसेतील त्यांच्यासाठी ही आयपीएल थांबवली जाणार नाही”






